दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या पूजा हेगडेने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. नुकतीच ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये झळकली. आपल्या सौंदर्याने व अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी पूजा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले ग्लॅमरस लूकमधले बरेच फोटोज ती शेअर करत असते. बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला नुकतंच जीवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त समोर आले होते.

दुबईच्या एका क्लबमध्ये पूजा हेगडेने नुकतीच हजेरी लावली. तिथे एका व्यक्तीबरोबर पूजाचे चांगलेच वाद झाले अन् त्यानंतर तिला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्याची बातमी समोर आली होती. इंस्टाग्रामवरही बऱ्याच मीडिया रीपोर्टर्सनी ही बातमी चांगलीच व्हायरल केली. एका क्लबच्या उद्घाटनाला गेलेल्या पूजा हेगडेला अशा जीवे मारण्याच्या धमक्या आल्यावर बऱ्याच लोकांनी चिंता व्यक्त केली.

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Worli accident case, Mihir Shah , High Court ,
वरळी अपघात : मिहीर शहावर खुनाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवण्याची मागणी, उच्च न्यायालयाने घेतली दखल
Supriya Sule and Saif Ali Khan
Attack on Saif Ali Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या…
supriya sule News
Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचे सरकारला नऊ प्रश्न; म्हणाल्या, “वाल्मिक कराड…”
trinidha rao nakkina apologize anshu ambani
आधी अभिनेत्रीच्या शरीराबद्दल केलं आक्षेपार्ह विधान, नंतर दिग्दर्शकाने मागितली माफी; अंशू अंबानी प्रतिक्रिया देत म्हणाली…
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक

मात्र आता चिंता करायचे काहीही कारण नाही. नुकतंच पूजाच्या टीमने याबद्दल स्पष्टीकरण देत या खोट्या बातमीचे खंडन केले आहे. पूजाच्या टीममधील एका व्यक्तिने ‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधताना याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. ती व्यक्ति म्हणाली, “ही खोटी बातमी कुणी पसरवली हे अद्याप आम्हाला ठाऊक नाही. हे अत्यंत धादांत खोटं आहे. पूजाला कुणीही जीवे मारण्याची धमकी दिलेली नाही.”

आणखी वाचा : ‘सॅम बहादुर’साठी विकी कौशलच का? मेघना गुलजारने सांगितलं कारण

अभिनेत्रीच्या टीमकडून हे स्पष्टीकरण आल्यानंतर पूजाच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. पूजा सध्या तिच्या प्रोजेक्टमध्ये प्रचंड व्यस्त आहे. लवकरच ती शाहिद कपूरबरोबरच्या ‘देवा’ या चित्रपटात झळकणार आहे. याबरोबरच ती ‘हाऊसफूल ५’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अर्शद वारसी, पूजा हेगडे, रितेश देशमुख, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन, बॉबी देओल, दिशा पटानी, रविना टंडनही दिसणार आहेत.

Story img Loader