अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी व तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल दोघेही २३ जून रोजी लग्न करणार आहेत. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. आजवर सोनाक्षीच्या लग्नाच्या फक्त चर्चा होत होत्या, कारण तिने किंवा झहीरने अथवा दोघांच्या कुटुंबियांनी त्याची पुष्टी केली नव्हती. पण आता सोनाक्षी व झहीरच्या लग्नाच्या बातमीवर ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लों यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री पूनम ढिल्लों यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांना सोनाक्षी व झहीरच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी लग्नाची बातमी खरी असल्याची माहिती दिली. “मी सोनाक्षीला खूप साऱ्या शुभेच्छा देते. तिने खूप सुंदर इनव्हाइट पाठवलं आहे. ती फार लहान होती, तेव्हापासून मी तिला पाहिलं आहे आणि तिचा संपूर्ण प्रवास पाहिला आहे. देवाच्या कृपेने ती खूप राहो. ती खूप प्रेमळ मुलगी आहे. तिला आयुष्यात खूप आनंद मिळो याच शुभेच्छा. झहीर तिला नेहमी आनंदी ठेव आणि ती खूप प्रेमळ मुलगी आहे हे लक्षात ठेव,” असं पूनम ढिल्लों ‘इन्स्टंट बॉलीवूड’शी बोलताना म्हणाल्या.
सोनाक्षीच्या लग्नाची पत्रिका
. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाच्या पत्रिकेत एक ऑडिओ क्यूआर कोड देण्यात आला आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर सोनाक्षी आणि झहीरचा इन्व्हिटेशन मेसेज ऐकू येतो. या ऑडिओ मेसेजच्या सुरुवातीला हे दोघे म्हणतात, “आमच्या सर्व, टेक सॅव्ही व गुप्तहेर मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांना हाय!” झहीर पुढे म्हणतो, “गेल्या सात वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. आनंद, प्रेम, एकमेकांसोबत हसणं या सगळ्या गोष्टींना आम्हाला या क्षणापर्यंत आणलं आहे.”
सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालच्या लग्नाची पत्रिका पाहिलीत का? जोडप्याने खास मेसेज केलाय शेअर
सोनाक्षी पुढे म्हणते, “तो क्षण जेव्हा आम्ही एकमेकांच्या कथित गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या पलीकडे जाऊन पुढचं पाऊल उचलतोय.” झहीर म्हणतो, “एकमेकांचे अधिकृत पती-पत्नी बनण्यासाठी.” यानंतर दोघे एकत्र म्हणतात, “तर तुमच्याशिवाय हे सेलिब्रेशन पूर्ण होणार नाही, म्हणून २३ जूनला तुम्ही जे काही करत आहात ते सोडून आमच्याबरोबर पार्टी करा.”
झहीर इक्बालशी लग्नाच्या चर्चा, सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “मला माझ्या आई-वडिलांपेक्षा…”
शत्रुघ्न सिन्हांची प्रतिक्रिया
“सोनाक्षी माझी एकुलती एक मुलगी आहे अन् ती माझ्या खूप जवळ आहे. जर माझ्या मुलीचे लग्न होत असेल तर मी तिच्या निर्णयाला पाठिंबा देईल. सोनाक्षीला तिचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे आणि मी तिच्या लग्नाच्या दिवशी सर्वात आनंदी बाबा असेन,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.