बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) निधन झाल्याची माहिती शुक्रवारी (२ फेब्रुवारी ) तिच्या टीमकडून देण्यात आली होती. तिच्या मॅनेजरने यासंदर्भात सविस्तर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. त्यामुळे एकंदरीत पूनमच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं होतं. अखेर या २४ तास सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पूनम पांडे जिवंत असल्याचं समोर आलं आहे.

पूनम पांडेने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. “मी जिवंत आहे, कर्करोगामुळे माझा मृत्यू झालेला नाही” असं तिने या व्हिडीओद्वारे स्पष्ट केलं आहे. याशिवाय यामध्ये तिने सर्वांची माफी मागितली आहे.

readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Nitin chauhan death reason
काम मिळत नसल्याने अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, पत्नी-मुलगी घरात नसताना गळफास घेऊन संपवलं आयुष्य
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
Leopard's Viral Video
‘नशीब चांगलं असलं की मृत्यूही मागे फिरतो…’ श्वानावर बिबट्याचा क्रूर हल्ला.. पण, पुढे जे घडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”

हेही वाचा : “बोगद्यामध्ये १ तास अडकून…”, आदेश बांदेकरांनी सांगितला प्रवासादरम्यानचा अनुभव; म्हणाले, “एका चुकीमुळे…”

“मी जिवंत आहे…सुदैवाने सरव्हायकल कॅन्सरमुळे माझं निधन झालेलं नाही. पण, आज देशातील हजारो महिलांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. कित्येक महिलांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. या गंभीर आजाराचा सामना कसा करायचा याबद्दल पुरेशी जनजागृती महिलावर्गात झालेली नाही. पण, तुम्हाला माहितीये का? सरव्हायकल कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी तुम्हाला वेळच्या वेळी आरोग्य तपासणी व HPV लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. आपण एकत्र मिळून या आजाराबाबत जनजागृती करुया. तुम्ही माझ्या वेबसाइटला जरुर भेट द्या. ही बातमी पैशांसाठी नव्हे तर जनजागृतीसाठी पसरवली” असं पूनम पांडेने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

दरम्यान, स्वत:च्या निधनाची खोटी माहिती शेअर केल्यामुळे सध्या पूनम पांडे विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. याशिवाय मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी देखील पूनमच्या या पोस्टवर कमेंट्स करत घडल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.