शुक्रवारी (२ फेब्रुवारी रोजी) सकाळी अभिनेत्री पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ज्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने तिचं निधन झाल्याचं म्हटलं होतं. या घटनेनंतर चाहत्यांना धक्का बसला. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तिला श्रद्धांजली वाहिली. पण शनिवारी सकाळी तिने व्हिडीओ शेअर करत आपण जिवंत असल्याचं म्हटलं आहे.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने पूनम पांडेने तिच्या निधनाची खोटी पोस्ट केली होती. तिच्या निधनाची बातमी आल्यानंतर २४ तासांनी पूनम समोर आली असून तिने जिवंत असल्याचं सांगितलं आहे. तिने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केलं आहे. आता वाईट पब्लिसिटी स्टंट असल्याचं अनेक युजर्स म्हणत आहेत.

“मी जिवंत आहे”, नाट्यमय घडामोडींनंतर अखेर जगासमोर अवतरली पूनम पांडे; म्हणाली, “कर्करोगामुळे माझा मृत्यू…”

पूनम पांडेच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करून नाराजी व्यक्त करत आहेत. ‘हिला अटक करा,’ ‘खूप वाईट पब्लिसिटी स्टंट होता’, ‘गंभीर विषयांबद्दल जनजागृती करताना असा पब्लिसिटी स्टंट करणं चुकीचं आहे,’ अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.

Poonam Pandey alive netizens trolled 2
पूनम पांडेच्या पोस्टवरील कमेंट्स
Poonam Pandey alive netizens trolled 2
पूनम पांडेच्या पोस्टवरील कमेंट्स

‘प्रसिद्धीसाठी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा गैरफायदा घेणं निंदनीय आहे. जागरुकता पसरवण्यासाठी तुमचा प्लॅटफॉर्म वापरणं हे कौतुकास्पद आहे, पण तुमच्या स्वत:च्या मृत्यूची खोटी माहिती पसरवणं खूप वाईट आहे,’ अशा कमेंट्स तिच्या व्हिडीओवर आहेत.

Poonam Pandey alive netizens trolled 3
पूनम पांडेच्या पोस्टवरील कमेंट्स

दरम्यान, अचानक तिच्या निधनाची बातमी आल्याने चाहत्यांसह अनेक कलाकारांना धक्का बसला होता. तिच्या अनेक मित्रांनी तिच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणीही केली होती. पूनम पांडेने केलेल्या या निधनाच्या पोस्टबद्दल चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

Story img Loader