Poonam Pandey Died at 32 : बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडेचं वयाच्या ३२ व्या वर्षी निधन झालं आहे. सरव्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग)मुळे तिचं निधन झाल्याची माहिती तिच्या टीमकडून देण्यात आली. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन यासंदर्भात पोस्ट शेअर करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनामुळे बॉलीवूडकरांसह तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

पूनमने वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. तिची व्यवस्थापक पारुल चावलाने ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, “पूनमला काही दिवसांपूर्वी सरव्हायकल कॅन्सरचे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) निदान झाले. तेव्हा या आजाराचा शेवटचा टप्पा सुरू होता. अखेरच्या टप्प्यात तिला खूप त्रास सहन करावा लागत होता. ती शेवटच्या क्षणी तिच्या गावी म्हणजेच कानपूर येथे राहण्यासाठी आली होती. तिच्या पार्थिवावर कानपूरमध्येच अंतिम संस्कार केले जातील.”

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
Japanese actress Miho Nakayama found dead
प्रसिद्ध अभिनेत्री घरातील बाथटबमध्ये आढळली मृतावस्थेत
Allu Arjun
‘पुष्पा 2’ च्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू, अल्लू अर्जुनने २५ लाखांच्या मदतीचं दिलं आश्वासन

पूनमने २०१३ मध्ये ‘नशा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय २०११ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापूर्वी केलेल्या एका वक्तव्यामुळे पूनम सर्वाधिक चर्चेत आली होती. तसेच बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतने होस्ट केलेल्या ‘लॉकअप’ या रिॲलिटी शोच्या पहिल्या सीझनमध्ये पूनम पांडे झळकली होती. परंतु, हा शो ती जिंकू शकली नाही. तिच्या निधनाने चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

Story img Loader