बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडे आपल्या बोल्ड लूक्समुळे कायम चर्चेत असते. पूनम तिच्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. पूनमचे देशभरात लाखो चाहते आहेत. पण पूनमच्या या लहानग्या चाहत्याला तुम्ही पाहिलंय का?

पूनमचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये क्रिकेट खेळत असणारी लहान मुलं पूनमला भेटायला येतात असं दिसंतय. पूनम त्यांची विचारपूस करते. त्या लहान मुलांशी संवाद साधताना पूनम त्यांना म्हणते, “तुम्ही मुलं कुठे क्रिकेट खेळत होता?” तर यावर मुलं म्हणतात- “इथेच”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
ranveer allahbadia dating actress nikki sharma
प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाने शेअर केला गर्लफ्रेंडचा फोटो? ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चाहत्यांनीच केला खुलासा

हेही वाचा… “आए हाए, ओए होए… बदो बदी” या व्हायरल गाण्याची पडली ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडेला भुरळ; व्हिडीओ व्हायरल

तेवढ्यात पूनमचा एक लहानगा फॅन तिला विचारतो, “तुमची इन्स्टाग्राम आयडी आहे का?” यावर पूनम म्हणते, “तू माझी इन्स्टाग्राम आयडी घेऊन काय करणार?”

पूनम पुढे त्याला म्हणते, “तुझ्या आईला घाबरत नाहीस का तू? असं वागलास तर आई मारेल तुला. “

हेही वाचा… “मी अशिक्षित माणूस…”, अक्षय कुमारला अभ्यासाची कधीच नव्हती आवड; म्हणाला, “माझ्या मुलीला ट्विंकलकडून…”

तिकडे जमलेल्या लोकांना पूनम म्हणते, “बघा पूनम पांडेचं आयडी मागतोय. हिंमत बघा याची. आजकालची मुलं तर बघा, इन्स्टाग्राम आयडी मागतायत. पुढे जाऊन मी तुम्हाला मेसेज करेन असंही म्हणतील.”

पूनम पांडेच्या चाहत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “बच्चे मन के सच्चे” तर दुसऱ्याने लिहिलं, “म्हणजे पूनमला माहित आहे की तिची इन्स्टाग्राम आयडी लहान मुलांना दाखवण्यासारखी नाही आहे.”

हेही वाचा… “पाय दुखायला लागले पण…”, पहिल्याच हिंदी सिनेमात ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला मिळाली होती ‘अशी’ वागणूक; म्हणाले, “चिखलाच्या…”

दरम्यान, पूनम पांडे चर्चेत राहण्यासाठी अनेक पब्लिसिटी स्टंट करत असते. मध्यंतरी पूनमने तिच्या निधनाची अफवा सर्वत्र पसरवली होती. पूनम पांडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅंडलवरुन तिच्या निधनाबद्दल माहिती कळवली होती. अफवेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी पूनमने सोशल मीडियावर ती जिवंत आहे असं कबूल केलं होतं. या प्रकरणामुळे पूनम प्रचंड ट्रोल झाली होती.

पूनमच्या या बातमीने तिच्या चाहत्यांना आणि अनेक लोकांना मोठा धक्का बसला होता. सर्वाइकल कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तिने अशी पोस्ट शेअर केली होती, असं तिचं म्हणणं होतं.

Story img Loader