बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) निधन झाल्याची माहिती शुक्रवारी (२ फेब्रुवारी) तिच्या टीमकडून देण्यात आली होती. तिच्या मॅनेजरने यासंदर्भात सविस्तर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. त्यामुळे एकंदरीत पूनमच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढत चाललं होतं. अखेर या २४ तास सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर पूनम पांडे जिवंत असल्याचं समोर आलं.

पूनम पांडेने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. “मी जिवंत आहे, कर्करोगामुळे माझा मृत्यू झालेला नाही” असं तिने या व्हिडीओद्वारे स्पष्ट केलं आहे. याशिवाय यामध्ये तिने सर्वांची माफी मागितली आहे. सरव्हायकल कॅन्सर या गंभीर आजाराबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी पूनम आणि तिच्या पीआर टीमने हे पाऊल उचललं होतं हे तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट केलं. तरुण मुलींनी या आजारावरची लस घ्यावी अन् त्याविषयी लोकांमध्ये चर्चा व्हावी यासाठी पूनमने स्वतःच्या मृत्यूचं हे नाटक रचल्याचं कबूल केलं.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Bhaskar Jadhav sunil kedar
“सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू”, शिवसेना नेते भास्कर जाधव यांची जहरी टीका
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
nawab malik
नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा ,मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

आणखी वाचा : “मी चालत होते अन् मागून कुणीतरी माझ्या…”, भूमी पेडणेकरने सांगितला वयाच्या १४ व्या वर्षी आलेला ‘तो’ भयानक अनुभव

तिच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर तिला लोकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. इतक्या खालच्या थराला जाऊन केवळ पब्लिसिटीसाठी असा स्टंट करणाऱ्या पूनमला अटक करायला हवी अशी मागणी काहींनी केली आहे. मनोरंजनसृष्टीतील बऱ्याच लोकांनी पूनमची कानउघडणी केली आहे. तर पूनमने ज्याच्याशी काही वर्षांपूर्वी लग्न केलेलं त्या सॅम बॉम्बेने या गोष्टीवर मौन सोडलं आहे. लग्नानंतर लगेचच काही महिन्यात पूनमने सॅम बॉम्बेकडून घटस्फोट घेतला होता. आता पूनमच्या या पब्लिसिटी स्टंटनंतर सॅमने यावर त्याचं मत मांडलं आहे.

हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना सॅम म्हणाला, “ती जीवंत आहे हे ऐकूनच मला आनंद झाला आहे. माझी एक गोष्ट नीट लक्षात ठेवा जर एखादा सेलिब्रिटी त्याला मिळणारं फेम ग्लॅमर, प्रतिमा बाजूला ठेवून एखाद्या गंभीर समस्येबद्दल जनजागृती करत असेल तर आपण त्याचा आदर करायला हवा. पूनम पांडे हे भारतातील सर्वात बोल्ड महिला आहे, आजपासून पुढील कित्येक वर्षं तिच्या या कृतीची चर्चा होईल व साऱ्या जगात याची दखल घेतली जाईल.” सॅम बॉम्बेची ही प्रतिक्रिया ऐकून बऱ्याच लोकांना धक्का बसला आहे. एकीकडे लोक, सेलिब्रिटीज पूनमच्या या वागण्यावर टीका करत आहेत तर दुसरीकडे पूनमचा पूर्व पती मात्र तिच्या य कृतीचं समर्थन करताना दिसत आहे.