कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन पूनम पांडेचा आज ११ मार्च रोजी वाढदिवस आहे. अशातच तिची एक मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती वर्ल्ड कप कॉन्ट्रोव्हर्सीबद्दल बोलताना दिसत आहे. पूनम पांडे २०११ मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. त्यावेळी तिने भारतात सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान एक वक्तव्य केलं होतं, ज्याची चांगलीच चर्चा झाली होती.
भारताने विश्वचषक जिंकला तर ती तिचे कपडे काढेन, असं पूनम पांडेने त्यावेळी म्हटलं होतं. त्या एका वक्तव्यामुळे ती खूपच चर्चेत राहिली होती. किंबहुना त्यानंतरच तिला ओळख मिळाली. बोल्ड स्टेटमेंट करणारी पूनम तिच्या बोल्ड लूकमुळे आणि न्यूड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. पूनम पांडेने ‘रेडिओ मिर्ची’ला दिलेल्या मुलाखतीत ते वक्तव्य का केलं होतं, याचा खुलासा केला. तसेच त्यानंतर तिच्या पालकांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दलही ती बोलली आहे.
पूनम पांडे म्हणाली, “मी तेव्हा १८ वर्षांची होते आणि विचार करत होते की मला आयुष्यात काय करायचं आहे. चला काहीतरी मोठं करूया, या विचारत होते. तेव्ही मी पाहिलं की क्रिकेट चालू आहे आणि संपूर्ण देश क्रिकेट पाहतो. मला क्रिकेटचे ज्ञान अजिबात नाही. मला क्रिकेटपटूंची नावं माहीत नाहीत. मला काहीच माहीत नव्हतं, पण मला काहीतरी करायचं होतं. त्यामुळे मी विचार केला की चला एक स्टेटमेंट करावं आणि ते असं असावं की भारतात खळभळ उडेल. मी तेच केलं आणि भारत विश्वचषक जिंकला.”
पूनम पांडे पुढे म्हणाली, “मी बोलून तर दिलं, नंतर मला भीती वाटत होती की आता मला हे करावं लागेल. माझ्या वक्तव्यानंतर घरात प्रचंड गोंधळ सुरू होता. माझी आई मला मारत होती, माझे बाबा माझ्यावर ओरडत होते आणि तू हे काय केलंस असं विचारत होते.”
“मी याबद्दल त्यानंतर कधीही बोलले नाही, मला कोणीही ओळखत नाही, प्रत्येकाला एवढंच माहीत आहे की मी कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन आहे, जिला नेहमी तिची बॉडी शो ऑफ करणं आवडतं. होय, मी ते केलंय कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी इथपर्यंत कशी पोहोचू? या प्रश्न माझ्या मनात येत असताना हा एकच पर्याय माझ्या मनात आला. मी ही संधी मिळाल्यावर ती सोडली नाही, कारण मला इतरांसारखी तडजोड करायची नव्हती,” असं पूनम पांडेंने सांगितलं.