‘गदर २’ चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात दमदार कमाई केली आहे. चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. अवघ्या सहा दिवसात २५० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या ‘गदर २’ ने सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. सातव्या दिवशी २३.२८ कोटी रुपयांची कमाई करत लवकरच ‘गदर २’ हा ३०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही लोकांना चित्रपट प्रचंड आवडला आहे तर काहींनी त्यावर भरपूर टीकाही केली आहे. काही लोकांनी पहिल्या भागाच्या तुलनेत हा भाग फारच वाईट असल्याचंही म्हंटलं आहे. इतकंच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि अभिनेत्याने ‘गदर २’च्या कमाईच्या आकड्यांवरच संशय व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : “सध्याच्या संगीतकारांमध्ये…” ‘व्हॉट झुमका’ गाण्यावर आशा भोसलेंनी व्यक्त केली खंत

प्रसिद्ध अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके याने ‘गदर २’ च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर संशय व्यक्त केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये केआरके म्हणतो, “गदर २ च्या निर्मात्यांना खोटी तिकिटे विकत घ्यायची गरजच काय जेव्हा ते प्रत्येक दिवसाला त्यांचं कलेक्शन ५ ते ६ कोटींणी वाढवून दाखवत आहेत. मला सेबीला विचारायचं आहे की झी स्टुडिओ त्यांच्या शेअरची किंमत वाढवण्यासाठी जर असं करत असेल तर हा भ्रष्टाचार नाही का? सेबीने यावर त्वरित कारवाई करावी.”

या ट्वीटमध्ये केआरकेने ‘SEBI’च्या अधिकृत अकाऊंटलाही टॅग केलं आहे. एकूणच ‘गदर २’च्या कलेक्शनची संख्या ही खोटी आहे असं याआधीही केआरकेने ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं आहे. कमाल खान हा त्याच्या अशाच ट्वीटच्या माध्यमातून बॉलिवूडवर सतत टीका करत असतो. या वादग्रस्त ट्वीटमुळे त्याला मध्यंतरी तुरुंगवासही भोगावा लागला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular actor and self claimed critic says gadar 2 box office collections are fake avn
Show comments