Prabhu Deva Son Rishii Raghavendra Deva: प्रभू देवाने आपल्या डान्स कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. प्रभू देवाच्या डान्सचे जगभरात चाहते आहेत. त्याला अनेकजण गुरू मानतात. प्रभू देवा डान्स व्यतिरिक्त निर्माता, अभिनेता म्हणून आता काम करताना दिसतो. असा हा हरहुन्नरी डान्सर प्रभू देवाने आता त्याच्या मुलाला सगळ्यांसमोर आणलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नुकताच प्रभू देवाने ( Prabhu Deva ) लेकाबरोबर पहिल्यांदाच परफॉर्मन्स केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रभू देवाने त्याच्या मुलाची ओळख करून दिली आहे. प्रभूने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “मला माझा मुलगा ऋषि राघवेन्द्रची ओळख करून देताना खूप अभिमान वाटत आहे. हा एक वारसा आहे, एक आवड आहे आणि नुकताच सुरू झालेला प्रवास आहे.”

प्रभू देवाने ( Prabhu Deva ) शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघं ‘पट्टी रॅप’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. त्यानंतर काही वेळासाठी प्रभू देवा बाजूला जातो आणि मुलाला एकट्याने डान्स करू देतो. शेवटी निवेदिका प्रभू देवाच्या मुलाची ओळख करून देते. यावेळी प्रभू देवा मुलाला इशारा करत स्टेजला नमस्कार करायला सांगतो. एवढंच नाही तर प्रभू देवा मुलाच्या गालाला हात लावून प्रेमाने चुंबन घेतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “जसा बाप, तसा मुलगा.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “प्रभू देवा नेहमी नम्र असतो. तो आपल्या मुलाला स्टेजवरून सर्वांचे आभार मानण्यासाठी आणि स्टेजला नमस्कार करण्यासाठी सांगत आहे. खूप जबरदस्त परफॉर्मन्स दोघांनी केला आहे.”

दरम्यान, प्रभू देवाला भारताचा मायकल जॅक्सन म्हटलं जात. प्रभू देवाने नृत्यदिग्दर्शन केलेली अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी प्रभू देवाला गौरविण्यात आलं आहे.

Story img Loader