मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात असतात. हे सेलेब्रिटी त्यांच्या आयुष्यातील खास क्षण त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. आता ‘हुस्न’ आणि ‘जो तुम मेरे हो’ सारख्या गाण्यांना आवाज देऊन लोकांची मने जिंकणारा आणि ब्रेकअपच्या गाण्यांसाठी ओळखला जाणारा गायक अनुव जैन(Anuv Jain) विवाहबंधनात अडकला आहे. कुटुंब व इतर जवळच्या लोकांच्या उपस्थितीत या गायकाने लग्नगाठ बांधली आहे.या विवाह सोहळ्यातील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

प्रसिद्ध गायकाने गर्लफ्रेंडशी बांधली लग्नगाठ

अनुवने त्याची गर्लफ्रेंड हृदि नारंगशी लग्न केले आहे. हे फोटो शेअर करताना त्याने, “और यहाँ देखो कैसी आयी दो दिलों की बारात है”, अशी कॅप्शन दिली आहे. रेडिटनुसार अनुवने १४ फेब्रुवारी २०२५ ला दिल्लीमध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या शाही लग्नाच्या लूकने सर्वांची मने जिंकल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर लोकांना या जोडप्याचे लग्नापूर्वीचे फोटोही आवडले. ज्यामध्ये हृदिचे लेहेंगा तसेच शरारामध्ये फोटो पाहायला मिळत आहेत. अनुवने सोनेरी रंगाची शेरवानी घातल्याचे पाहायला मिळत आहे. अनुवच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी त्याच्या ब्रेकअप गाण्यांवर विनोद करीत त्याने आता लग्न केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, अनुव जैनने २०२२ मध्ये हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली होती. यामध्ये त्याने तो रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याबद्दल त्याने कोणताही खुलासा केला नव्हता. पुढे बघूयात काय होतंय, असे त्याने म्हटले होतेय. या मुलाखतीत त्याने त्याच्या मजाक या गाण्याविषयी बोलताना म्हटले होते की मजाक हे गाणे प्रेमावर आधारित आहे. हे गाणे प्रेमावर भाष्य करते. जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल, अशी कमी अपेक्षा ठेवता. तेव्हा तुम्ही अचानक प्रेमात पडता. हे माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार मी सांगत आहे, असे त्याने म्हटले होते. आता मात्र त्याने त्याच्या गर्लफ्रेंडशी लग्न करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. अनुव जैनचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चाहते असल्याच दिसते. २ मिलियनहून अधिक त्याच्या फॉलोअर्सची संख्या आहे.

Story img Loader