मनोरंजनसृष्टीतील कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. हे कलाकार कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, तर कधी त्यांनी केलेली वक्तव्ये यांमुळे चर्चांचा भाग बनतात. आता लोकप्रिय गायक शान (Shaan)ने एका मुलाखतीदरम्यान मंगेशकर कुटुंबीयांबरोबर असलेल्या संबंधावर वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाला शान?

लोकप्रिय गायक शानने अमोल परचुरेंना नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मंगेशकर कुटुंबीयांबरोबर असलेल्या संबंधाबाबत वक्तव्य केले. तो म्हणाला, “ज्यांना मी पूजतो, त्यांच्या नावाचा म्हणजे ‘आशा भोसले’ पुरस्कार नुकताच मला मिळाला. मीना मंगेशकर यांच्यासोबत माझ्या वडिलांनी भरपूर काम केलं आहे.”

पुढे बोलताना तो म्हणतो, “त्यांची अनेक गाणी माझ्या वडिलांनी बंगालीमध्ये गायली आहेत. त्यांचे चल रे भोपळ्या टुणूक टुणुक हे गाणे बंगालीमध्येदेखील आहे. मी जे पहिलं गाणं गायलं होतं, ते मीना मंगेशकर यांनी रचलेलं आहे. तेव्हा मी साडेचार वर्षांचा होतो. लताजी, आशाजी, उषाजी या सगळ्यांकडून माझ्या वडिलांना खूप प्रेम मिळालं. एकंदरीत मंगेशकर कुटुंबाकडून माझ्या वडिलांना खूप प्रेम लाभलं. माझ्या वडिलांची जास्तीत जास्त गाणी उषाजींनी गायली आहेत”, असे शानने या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे.

त्याबरोबरच शानने इंडीपॉप गाण्यांबद्दलही वक्तव्य केले आहे. इंडीपॉप हे प्रसिद्ध होत असतानाच का बंद झाले, या प्रश्नाला उत्तर देताना त्याने म्हटले, “अनेक लोक त्यामध्ये यायला लागले. लोकांना वाटले की, ही प्रसिद्ध होण्याची चांगली संधी आहे. टीव्हीवर येऊ शकतो, असे लोकांना वाटू लागले. स्वत:च स्वत:चे व्हिडीओ बनवले गेले; मात्र त्यामुळे त्याचा दर्जा खालावला.”

हेही वाचा: “गाड्या उडतात, माणसं उडतात अन्…”, प्रभासला ‘जोकर’ म्हटल्यावर अर्शद वारसीचा दाक्षिणात्य चित्रपटांबद्दलचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

“यापेक्षाही त्यावेळी व्हिडीओ, गाणी व ऑडिओ यांचा एक स्तर, दर्जा होता. एका बाजूला व्हिडीओमध्ये शाहरुख खान, सलमान खान असे मोठमोठे अभिनेते काम करीत आहेत आणि तिथे एका बाजूला हे सगळे चालले आहे. त्यावेळी आम्हीच आमचे मार्केट खाली आणले. इंडीपॉपसाठी एक वेगळे चॅनेल होते; मात्र रेडिओवाले म्हणाले की, टीआरपी येत नाही. त्यामुळे इंडीपॉप बंद झाले”, असे शानने म्हटले आहे.

दरम्यान, वयाच्या १५ व्या वर्षी १९८९ मध्ये ‘परिंदा’ या चित्रपटातील ‘कितनी है प्यारी प्यारी दोस्ती हमारी’ या गाण्यातील एक ओळ गायली होती. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्यार में कभी कभी’ चित्रपटात त्याने दोन गाणी गायली आहेत. आजपर्यंत शानने अनेक चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्याने गायलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Popular singer shaan shared relation with mangeshkar family said they gave so much love to my father nsp