‘सेक्स’ हा विषय अजूनही आपल्या देशात चार चौघांत चर्चा करण्यासारखा मानला जात नाही. या विषयावर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बरीच चर्चा होत असली, बरेच तज्ञ यावर उघडपणे भाष्य करत असले तरी ‘सेक्स’ शब्द कानावर पडताच कित्येकांची नाकं मुरडतात. बरेच सेलिब्रिटीजसुद्धा या विषयावर उघडपणे बोलायचं टाळतात. पण एक बॉलिवूड अभिनेता आहे ज्याने यावर आधीही भाष्य केलं आहे अन् त्याच्या एका नव्या जाहिरातीमुळे तो चर्चेत आला आहे, तो बिनधास्त अभिनेता म्हणजे रणवीर सिंग.

याआधीदेखील रणवीरने कंडोमच्या जाहिराती केल्या आहेत अन् आता आता तर त्याने चक्क प्रसिद्ध पॉर्नस्टार जॉनी सीन्सबरोबर एक जाहिरात केली आहे ज्याची सर्वत्र चर्चा आहे. नुकतीच रणवीरने ही जाहिरात त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. यामध्ये एक विवाहित तरुणी रणवीरकडे त्याचा भाऊ जॉनी सीन्सबद्दल तक्रार करताना दिसत आहे. जाहिरातीमध्ये बरेच डबल मिनिंग संवाद आपल्याला ऐकायला मिळतात ज्यावरून आपल्याला हे स्पष्ट होतं की पुरुषांच्या सेक्स प्रॉब्लेमबद्दल यात भाष्य करण्यात आलं आहे.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’मुळे प्रभासचा ‘स्पिरीट’ लांबणीवर; संदीप रेड्डी वांगा कधी सुरू करणार चित्रपटावर काम?

अत्यंत गंभीर विषय पण फार विनोदी पद्धतीने या जाहिरातीत हाताळला आहे. जॉनी सीन्सचे सेक्स प्रॉब्लेम दूर करणाऱ्या रणवीरची ही जाहिरात सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ‘बोल्ड केअर’ या ब्रॅंडसाठी रणवीर आणि जॉनी सीन्स यांनी मिळून ही जाहिरात केली आहे. पुरूषांच्या लैंगिक समस्या दूर करण्यासाठी बरेच प्रॉडक्ट या ब्रॅंडने बाजारात आणले आहेत त्यासाठीचीच ही जाहिरात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अत्यंत विनोदी अशी ही जाहिरात लोकांना हसवते पण त्याबरोबरच एका गंभीर विषयावरही भाष्यही करते. या जाहिरातीचे लिखाण ‘एआयबी’फेम तन्मय भट्ट आणि त्याच्याबरोबरच्या टीमने केले आहे, तर याचे दिग्दर्शन अय्यप्पा केएम यांनी केले आहे. जॉनी सीन्सची ही पहिलीच भारतीय जाहिरात ठरली आहे. याआधी जॉनी सीन्सने प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बामच्या शोमध्ये हजेरी लावली होती. ज्याची जबरदस्त चर्चा झाली होती.

आता थेट बॉलिवूड स्टार रणवीरबरोबर जाहिरात केल्याने जॉनी सीन्स चर्चेत आला आहे. रणवीरने शेअर केलेल्या या जाहिरातीखाली बऱ्याच लोकांनी कॉमेंट केल्या आहेत. अर्चना पूरण सिंग व टेलिव्हिजन अभिनेता नकुल मेहता यांनी रणवीरच्या धाडसी प्रयत्नाचे कौतुक केले आहे. या जाहिरातीविषयी बोलताना रणवीर म्हणाला, “या जाहिरातीमधून या समस्येला वाचा फोडण्याचं काम मी माझ्याकडून सुरू करायचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भविष्यात नक्कीच समाजावर याचा सकारात्मक परिणाम दिसेल.” रणवीर आता लवरकच ‘सिंघम अगेन’ आणि ‘डॉन ३’मध्ये झळकणार आहे.

Story img Loader