‘आदिपुरुष’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. येत्या १६ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची सध्या चांगलीच चर्चा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही चित्रपटगृहांमध्ये ‘आदिपुरुष’च्या ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’च्या एका तिकिटासाठी प्रेक्षकांना दोन हजार रुपयांना मोजावे लागणार आहेत. दिल्लीच्या PVR मध्ये तिकिटाची किंमत खूप जास्त आहे. तसेच दिल्लीतील PVR सिलेक्ट सिटी वॉक गोल्डमध्ये तिकिटाची किंमत १८०० रुपये आहे. या दोन्ही चित्रपटगृहांमधील पहिल्या दिवसाच्या शोची संपूर्ण तिकिटे विकली गेली आहेत. तसेच एडाच्या पीव्हीआर गोल्ड, लॉजिक्स सिटी सेंटरमध्ये ‘आदिपुरुष’चं एक तिकीट १६५० रुपयांना आहे.
मुंबईतील पीव्हीआर लिव्हिंग रूम, ल्यूक्स, जियो वर्ल्ड ड्राइव्ह, बीकेसी या ठिकाणी ‘आदिपुरुष’च्या सर्व शोजसाठी प्रेक्षकांना दोन हजार रुपयांची तिकिटे विकत घ्यावी लागणार आहेत. तर आयनॉक्स, अट्रिया मॉल इनसिग्निया या ठिकाणी १७०० रुपयांचं एक तिकीट आहे. या थिएटरमध्येही पहिल्या दिवसाची तिकिटं विकली गेली आहेत.
हेही वाचा- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला तीन वर्ष पूर्ण, बहिणीची भावुक पोस्ट, म्हणाली, “मला माहीत आहे…”
चित्रपटाच्या प्रत्येक शोदरम्यान एक सीट हनुमानासाठी राखीव
या चित्रपटाच्या प्रत्येक शोदरम्यान एक सीट हनुमानासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर हनुमानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या सीटच्या बाजूच्या सीटच्या तिकिटाची किंमत थोडी जास्त असेल असं बोललं जात होतं. परंतु ‘टी-सीरिज’ कंपनीने एक ट्वीट करत याबाबत भाष्य केलं आहे. ‘आदिपुरुष’च्या तिकिटांच्या किमतीबद्दल काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. शोदरम्यान हनुमानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या सीटच्या बाजूच्या सीटच्या तिकिटाची किंमत जास्त असेल असं बोललं जाऊ लागलं आहे. मात्र तसं काहीही नाही. हनुमानासाठी राखीव सीटच्या बाजूच्या सीटच्या तिकिटाची किंमतही इतर तिकिटांच्या किमतीइतकीच असेल,” असं त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.