मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट प्रचंड गाजला आणि प्रेक्षकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला. त्यानंतर आता त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.

हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून यामध्ये दाखवल्या गेलेल्या दृश्यांमुळे या चित्रपटावर टीका गेली गेली. या चित्रपटावर केल्या गेलेल्या टीकेनंतर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. आता हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची तारीख समोर आली आहे.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाचा ट्रेलर ९ मे रोजी प्रदर्शित होऊ शकतो. एवढेच नाही तर ट्रेलर रिलीज होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच ८ मे रोजी हैदराबादमध्ये निर्मात्यांनी एक स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले आहे, या वेळी तिथे उपस्थित असणाऱ्यांना ‘आदिपुरुष’चा ट्रेलर दाखवला जाईल.

हेही वाचा : “मस्जिदचा मौलवी वाटतोय…”; देवदत्त नागेच्या ‘आदिपुरुष’मधील लूकवर टीका करणाऱ्याला प्रसिद्ध मराठी अभिनेता सडेतोड उत्तर देत म्हणाला, “काही चुकीचे…”

ओम राऊत गेले अनेक महिने या चित्रपटावर काम करीत आहे. या चित्रपटावर केली गेलेली टीका पाहून निर्माता-दिग्दर्शकांनी मिळून या चित्रपटातील दृश्यांमध्ये बदल केले. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे.

Story img Loader