दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास हा त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या टीझरमुळे फार मोठा वाद निर्माण झाला होता. आता याबरोबरच प्रभासच्या आणखी एका बिग बजेट चित्रपटाबद्दल नवीन अपडेट समोर आले आहे. ‘पठाण’चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदबरोबर प्रभासचा आगामी चित्रपटाबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण थांबविण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.

‘मैत्री प्रॉडक्शन हाऊस’ या बॅनरखाली एका चित्रपटावर काम सुरू होते, ज्यात प्रभास मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटासाठी प्रॉडक्शन कंपनीने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदला ६५ कोटी रुपयेही देऊ केले होते. आता मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट डबाबंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या चित्रपटासाठी सिद्धार्थ आनंद प्रभासला घेऊ इच्छित होता, पण केवळ प्रभासच्या तारखा जुळत नसल्याने हा चित्रपट पुढे ढकलला जात होता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : ‘ये जवानी है दिवानी’च्या सीक्वलबद्दल रणबीर कपूर स्पष्टच म्हणाला, “अयानच्या डोक्यात…”

हा चित्रपट आता डबाबंद झाल्याने कंपनीने दिलेले ६५ कोटीसुद्धा सिद्धार्थ आनंदला परत करावे लागले आहेत असे सांगितले जात आहे. अर्थात गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ आनंद ‘यशराज स्पाय युनिव्हर्स’वर काम करत असल्याने या चित्रपटासाठी त्याला वेळ काढता आला नसल्याने हा चित्रपट बंद झाल्याचेही म्हटले जात आहे.

सिद्धार्थ आनंद सध्या स्पाय युनिव्हर्ससह हृतिक रोशनच्या ‘फायटर’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. तर प्रभासही ‘आदिपुरुष’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच प्रभास ‘सलार’ या चित्रपतही झळकणार आहे. प्रशांत नील हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हा चित्रपट ‘केजीएफ’ युनिव्हर्सशी जोडला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

Story img Loader