अभिनेता प्रभासला ‘बाहुबली’ सिनेमामुळे संपूर्ण भारतात खरी ओळख मिळाली. सुरुवातीला प्रभासच्या लग्नाबद्दलची चर्चा फक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीपुरतीच मर्यादित होती. मात्र, ‘बाहुबली’नंतर ही चर्चा संपूर्ण भारतभर होऊ लागली. प्रभासचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं जाऊ लागलं. लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला प्रभास आजही ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ आहे. प्रभास कधी लग्न करणार याची चर्चा पुन्हा जोर धरत आहे. कारण- प्रभासच्या काकूने त्याच्या लग्नाबाबतचे संकेत दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच ‘कल्की 2898 AD’ या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत दिसला होता. प्रभासच्या या भूमिकेची खूपच चर्चा झाली. या चर्चांबरोबर आता त्याच्या लग्नाच्याही चर्चा जोर धरत आहेत.

हेही वाचा…“स्त्रीविषयक चित्रपट…”, कंगना रनौतने आलिया भट्टवर केली अप्रत्यक्ष केली टीका; म्हणाली…

प्रभासच्या काकूंनी काय सांगितले?

प्रभासचे काका ज्येष्ठ अभिनेते कृष्णन राजू यांच्या पत्नी श्यामला देवी या नुकत्याच विजयवाडातील कनक दुर्गा मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथे त्यांनी प्रभासच्या लग्नाविषयी सूचक विधान केलं. ‘123 तेलुगू’च्या माहितीनुसार, श्यामला देवी यांनी प्रभासच्या लग्नाची अधिक माहिती दिली नसली तरी कुटुंबाला त्याच्या लग्नाबद्दल उत्सुकता असल्याचं सांगितलं. त्यांनी असंही म्हटलं की, योग्य वेळ आली की, त्याचं लग्न होईल आणि त्यावेळी सगळ्यांना याची माहिती मिळेल.

प्रभासच्या काकूंच्या या विधानामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच्या लग्नाबाबतची उत्सुकता वाढली आहे. जरी प्रभासच्या काकूने या संदर्भात संपूर्ण माहिती दिली नसली तरी या सूचक विधानामुळे चाहत्यांमध्ये प्रभासचं लग्न लवकरच होईल या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा…“पुरुषप्रधान जगात स्त्री म्हणून…”, आलिया भट्टच्या तोंडून कौतुकाचे ‘ते’ शब्द ऐकताच समांथाचे डोळे पाणावले; व्हिडीओ व्हायरल

‘कल्की 2898 AD’च्या एका कार्यक्रमात प्रभासनं लग्नाबद्दल विनोदी अंदाजात वक्तव्य करताना म्हटलं होतं, “मी जर लग्न केलं, तर माझ्या महिला चाहत्यांना राग येईल आणि सध्या तरी मी तसं करू इच्छित नाही.”

हेही वाचा…नाकातून रक्त वाहत होतं तरी पाहिला सिनेमा…; अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा, म्हणाले, “माझा आवडता अभिनेता…”

प्रभास सध्या अनेक चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘द राजा साहब’, जो मरुथी दिग्दर्शित करीत आहे, तो १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात मालविका मोहनन व निधी अग्रवाल प्रमुख भूमिकांत आहेत. त्याशिवाय प्रभास संदीप रेड्डी वंगाच्या ‘स्पिरिट’, हनु राघव पुडीच्या आगामी प्रोजेक्ट व ‘सालार पार्ट २’मध्येदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhas marriage speculations rise again after hints from his aunt psg