अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता प्रभास हे मनोरंजन सृष्टीतील दोन आघाडीचे कलाकार आहेत. सध्या या दोघांचे नाव सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीतही सामील आहे. यांचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. पण आता पहिल्यांदाच दीपिका आणि प्रभास एकत्र काम करताना दिसणार असल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती. तर काही दिवसांपूर्वी त्यांच्या या चित्रपटात अमिताभ बच्चनही दिसणार असल्याचे समोर आले होते. या चित्रपटाचे नाव आहे ‘प्रोजेक्ट के.’ आता या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर येत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाची तारीख जाहीर होण्याच्या आधीच १०० हून अधिक कोटींची कमाई करण्याच्या वाटेवर आहे.

प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून आणि आतुरतेने वाट पाहत आहेत. गेले अनेक महिने प्रभास आणि दीपिका या चित्रपटावर काम करत आहेत. या चित्रपटाबाबत वरचेवर नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. आता या चित्रपटाने मोठी रक्कम फक्त या चित्रपटाचे हक्क विकूनच मिळविले आहेत.

आणखी वाचा : “२५ कोटी दिले तरीही आता मी तसे चित्रपट करणार नाही,” नवाजुद्दीन सिद्दिकीने जाहीर केला मोठा निर्णय

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, प्रभास आणि दीपिकाचा ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचे निजाम हक्क ७० कोटींना विकले गेले आहेत. सुनील नारंग यांनी त्यांना विकत घेतले आहे. सुनील नारंग हे आशियाई सुनील या नावाने इंडस्ट्रीत खूप लोकप्रिय आहेत. त्याचप्रमाणे या चित्रपटाचे आंध्र प्रदेशचे हक्क जवळपास १०० कोटींना विकले जातील. म्हणजेच हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच १७० कोटींची कमाई फक्त तेलुगू भाषिक राज्यांमध्ये करणार आहे. तसंच या चित्रपटाच्या उर्वरित वितरण राइट्सचीही मोठी मागणी आहे. रिलीजनंतरही बॉक्स ऑफिस कलेक्शन बाकी आहे.

हेही वाचा : दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्या ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, ‘हे’ आहे कारण

प्रभास आणि त्याच्या टीमने चित्रपटाचे जवळपास ८० टक्के शूटिंग पूर्ण केले आहे. येत्या काही महिन्यांत या चित्रपटाचं उरलेलं शूटिंग पूर्ण होईल. नागा अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट २०२४ साली प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं एकूण बजेट ५०० कोटी असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे प्रदर्शनाच्या आधी चित्रपटाचे हक्क विकूनच हा चित्रपट मोठी कमाई करणार असल्याचं दिसतंय.

Story img Loader