१६ जून रोजी प्रदर्शित झालेला ‘आदिपुरुष’ चित्रपट अवघ्या एका आठवड्यात बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस दमदार कमाई करणाऱ्या या चित्रटपटाच्या कलेक्शनमध्ये सोमवारपासून घट पाहायला मिळाली होती. आठव्या दिवशीही परिस्थिती जशी होती तशीच राहिली. निर्माते आणि लेखकांनी काही संवाद बदलले असले तरी त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही मीडिया रीपोर्टनुसार सध्याचा ट्रेंड पाहता या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत ‘आदिपुरुष’ हा चित्रपट दोन भागांमध्ये सादर करणार होते. ‘आदिपुरुष’ची लांबी जास्त होत असल्याने चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी हा निर्णय घ्यायचं ठरवलं होतं, हा प्रस्ताव ओम राऊतने प्रभाससमोरही ठेवला होता, पण केवळ प्रभासच्या या एका निर्णयामुळे आज ‘आदिपुरुष’ चांगली कमाई करू शकला असं म्हंटलं जात आहे.

आणखी वाचा : रामानंद सागर यांच्या ‘रामायण’वरही घातलेली दोन वर्षांची बंदी; असा काढलेला निर्मात्यांनी यावर तोडगा

मीडिया रीपोर्टनुसार ओम राऊतच्या या दोन भागांमध्ये चित्रपट करण्याच्या संकल्पनेला प्रभासने विरोध दर्शवला. ‘बाहुबली’च्या बाबतीत जे घडलं ते ‘आदिपुरुष’च्या घडण्याची शक्यता फार कमी असल्याचं प्रभासने स्पष्टपणे सांगितलं आणि ओम राऊतलाही हा चित्रपट एकाच भागात पूर्ण करण्यासाठी तयार केलं. काही ट्रेड एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार प्रभासचा हा निर्णय चित्रपटासाठी फार महत्त्वाचा ठरला.

प्रभासनेही या चित्रपटाच्या दोन भागांसाठी होकार दिला असता तर त्यावर २०० ते ३०० कोटी आणखी खर्च करावे लागले असते. आत्ता चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता तो खर्च आणि त्यामुळे होणारं नुकसान निर्मात्यांनाच झेलावं लागलं असतं. ‘आदिपुरुष’ ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनला असून ९ दिवसात या चित्रपटाला बजेटच्या निम्मे पैसेही वसूल करता आलेले नाहीत. यावरून आपल्याला अंदाज येईल की प्रभासच्या एका निर्णयामुळे ओम राऊत, टी-सीरिज यांना प्रचंद नुकसानापासून वाचवलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhas saved makers of adipurush by refusing idea of making a film in two parts avn