प्रभासची मुख्य भूमिका असलेला ‘कल्की: २८९८ एडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला असून आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणारा तो चौथा चित्रपट ठरला आहे. हा विक्रम करत ‘कल्की: २८९८ एडी’ या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाला मागे टाकले आहे.

नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की: २८९८ एडी’ चित्रपट २७ जून २०२४ ला प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्याच्या ४० दिवसांनंतर सर्व भाषांमध्ये या चित्रपटाने भारतात ७४० कोटींची कमाई केली आहे. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, कल्कीने हिंदी भाषेत ३५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तेलुगु भाषेत ३३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे; तर तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत चित्रपटाने एकूण ७५ कोटींची कमाई केली आहे.

in Mumbai 55 percent increase in price of affordable homes
मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
MHADA Non Residential Project MHADA 16 storey commercial complex in Pune Mumbai news
पुण्यात म्हाडाचे १६ मजली व्यावसायिक संकुल; आतापर्यंतचा म्हाडाचा सर्वात मोठा अनिवासी प्रकल्प
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
Mumbai ed investigation reveals Mehmood Bhagad is mastermind behind Rs 100 crore Malegaon scam
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा
Khesari Lal Yadav
कोट्यवधींचा मालक असूनही ‘हा’ भोजपुरी अभिनेता जगतो साधं आयुष्य; मिरची अन् भाकरी खातानाचा फोटो व्हायरल
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”

सर्वात जास्त कमाई करणारे पहिले तीन चित्रपट कोणते?

‘कल्की: २८९८ एडी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत चौथ्या क्रमांकावर मजल मारली आहे. पहिल्या क्रमांकावर प्रभासची मुख्य भूमिका असलेला ‘बाहुबली २’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाने १,४१७ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर ‘केजीएफ: चाप्टर २’ या चित्रपटाने १००१ कोटी रुपयांची कमाई केली होती; तर ‘आरआरआर’ या चित्रपटाने ९१६ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा: अनंत अंबानी-राधिका मर्चंटने हनिमूनसाठी निवडलं पॅरिसमधील ‘हे’ रिसॉर्ट, किंमत वाचून व्हाल हैराण

दरम्यान, प्रभासच्या या चित्रपटाने गेल्या महिन्यात संपूर्ण जगभरात बॉक्स ऑफिसवर १००० कोटींचा टप्पा गाठला होता. ‘कल्की : २८९८ एडी’ चित्रपट नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केला असून, या चित्रपटात दीपिका पदुकोण, कमल हासन, अमिताभ बच्चन, प्रभास, दिशा पटानी, मृणाल ठाकूर, दुलकिर सलमान, विजय देवरकोंडा या दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. हा चित्रपट विज्ञान आणि पौराणिक कथेचा योग्य संगम असल्याचे म्हटले जात आहे. विष्णूच्या दहाव्या अवताराची ही गोष्ट आहे. या चित्रपटाचे जगभरातून कौतुक होताना दिसत आहे. आता ‘कल्की: २८९८ एडी’ हा चित्रपट आणखी किती कमाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader