प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रकाश झा यांनी अभिनेत्री दीप्ती नवलशी लग्न केलं होतं. दोघांनी १९८५ मध्ये लग्न केलं होतं, पण २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दीप्ती नवल यांचं आठव्या महिन्यात मिसकॅरेज झालं होतं आणि त्यातूनच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जातं. शेवटी १७ वर्षांनी ते विभक्त झाले. पण प्रकाश झा यांना एक मुलगी आहे. तिचं नाव दिशा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अनुष्काने आई म्हणून मोठा त्याग केला” विराट कोहलीला पत्नीचं कौतुक, म्हणाला…

दिशा ही प्रकाश झा यांची स्वतःची लेक नाही. ती त्यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. प्रकाश यांना आधीपासून मुलगी दत्तक घ्यायची आवड होती. त्यांनी आणि दीप्ती यांनी १९९१ मध्ये दिशाला दत्तक घेतलं होतं. प्रकाश झा यांनी सांगितलं होतं की, १९८८ मध्ये त्यांना दिल्लीतील अनाथाश्रमातून एक फोन आला होता. एक १० महिन्यांची मुलगी एका सिनेमा हॉलमध्ये सीटखाली सापडल्याची माहिती त्यांना फोनवर कळाली. मुलीला संसर्ग झाला होता आणि तिच्या संपूर्ण शरीराला उंदराने कुरतडलं होतं आणि तिला किडे चावले होते. प्रकाश झा यांनी तातडीने त्या मुलीला घरी आणून तिची काळजी घेतली. मुलगी काही दिवसातच तंदुरुस्त झाली, त्यानंतर प्रकाश झा यांनी सर्व प्रक्रिया पार पाडून तिला दत्तक घेतलं आणि तिचं नाव दिशा ठेवलं.

एकीकडे प्रकाश झा यांच्या लेकीच्या येण्याने आनंद झाला, तर दुसरीकडे पत्नीशी घटस्फोट झाला. घटस्फोटाआधी प्रकाश झा दिल्लीत आणि दीप्ती नवल मुंबईत शूटिंगमुळे होते. अशा परिस्थितीत प्रकाश झा यांनी स्वत: त्या मुलीला एक वर्ष वाढवलं. ते स्वत: तिला आंघोळ घालायचे, खाऊ घालायचे आणि कामावरही बरोबर न्यायचे. मुलगी एक वर्षाची झाल्यावर प्रकाश झा यांनी चित्रपट सोडून पाटण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पाटण्यात आल्यानंतर प्रकाश झा यांनी एनजीओची स्थापना केली. इथं प्रकाश झा यांनी मुलीला त्यांच्या आईबरोबर ठेवलं.

फ्रीजमध्ये भांड्यात तरंगताना आढळलं डोकं; शरीराचे इतर अवयव गायब, सुप्रसिद्ध मॉडेलच्या खूनाने उडाली खळबळ

चार वर्षांनी त्यांच्या आईचं निधन झालं. तेव्हा प्रकाश झा यांच्याकडे काम नव्हतं. ते फक्त एनजीओचे काम पाहत होते. त्यामुळे त्यांनी दिशा सांभाळलं व काही वर्षांनी ते मुंबईला परतले आणि तिथे त्यांनी दिशाचं एका शाळेत अॅडमिशन केलं. त्यांची लेक आता मोठी झाली आहे. दिशाने काही चित्रपट निर्मितीमध्ये सहाय्यक म्हणून काम केलंय. ती चित्रपट निर्माती आहे. २०१९ मध्ये, दिशाने प्रकाश झा यांच्याबरोबर ‘फ्रॉड सैयां’ चित्रपटाची निर्मिती केली होती. दिशाचं ‘पान पेपर्स सीझर एंटरटेनमेंट’ नावाचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस देखील आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash jha deepti naval adopted daughter disha she was found in theater hrc
Show comments