बॉलिवूडचे आणि दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार प्रकाश राज हे नेहमीच त्यांच्या कामाने प्रेक्षकांना भुरळ घालत असतात. त्यांची प्रत्येक भूमिकेचे प्रेक्षक भरभरून कौतुक करतात. त्यांच्या अभिनयाबरोबरच प्रकाश राज त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. मुलाखतीत किंवा सोशल मीडियावर, ते निर्भयपणे आपला मुद्दा मांडताना दिसतात. प्रकाश राज लवकरच ‘झी5’ ची वेब सीरिज ‘मुखबिर’ मध्ये दिसणार आहेत. सध्या ते या वेब सिरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आता एका मुलाखतीदरम्यान त्यांनी बॉलिवूडमधील माफियांना खडे बोल सुनावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, प्रकाश राज यांनी वेब सीरिजबद्दल बोलताना मनोरंजन विश्वात सक्रिय असणाऱ्या माफियांचा उल्लेख आहे. करोना महामारीमुळे चित्रपट सृष्टीतील माफियांचा धंदा बंद पाडला आहे आणि त्यामुळे कलाकृतीत येणारी कृत्रिमता नाहीशी होत आहे.

आणखी वाचा : ‘पुष्पा २’ची प्रदर्शनाआधीच रेकॉर्डब्रेक कमाईला सुरुवात, ‘आरआरआर’ चित्रपटालाही टाकले मागे

प्रकाश राज यांनी नुकताच ‘हिंदुस्तान टाइम्स’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोरंजन क्षेत्रातील एका वेगळ्याच प्रकारच्या माफियाराजचा उल्लेख केला आहे. या मुलाखतीत प्रकाश सिनेमा, वेब सिरीज, चित्रपट आणि ओटीटीबद्दल बोलत होते. तेव्हा त्यांना बॉलिवूडमधील माफियाराजबद्दल विचारण्यात आले. त्या प्रश्नाचं उत्तर देताना प्रकाश राज म्हणाले, “सिनेमा ही एक भाषा आहे. ती कालपर्यंत नदीसारखी वाहत होती, पण काही लोकांनी तिचा प्रवाह बंद केला. त्यानंतर त्यांनी अनेक अटी घालायला सुरुवात केली.”

पुढे ते म्हणाले, “तुम्ही चित्रपट फक्त थिएटरमध्येच दाखवावे, अशा अटी त्यांनी घातल्या. कथा लिहायची असेल तर अडीच तासात संपेल अशीच लिहायची, असा विचार ते करू लागले. एखादी कथा टीव्हीवर प्रदर्शित करायला सर्वजण विरोध करत होते. पण दोन वर्षांपूर्वी करोना महामारी आली आणि तिच्या येण्याने या माफियाचा अंत झाला. तिथे मनोरंजनसृष्टीत तयार झालेली कृत्रिमता हळूहळू नाहीशी होत असल्याचे आपल्याला दिसत आहे. कलाकृती या अधिकाधिक ओरिजिनल होत चालल्या आहेत. लोकांना त्यांच्या विचाराच्या पुढे जायचे होते आणि आता उत्तमोत्तम कंटेन्टसाठी ओटीटी हे नवे माध्यम आले आहे.”

हेही वाचा : प्रकाश राज यांनी दत्तक घेतलेल्या गावाचे फोटो तेलंगणातील शहरी विकासमंत्र्यांनी केले शेअर, म्हणाले “हे गाव…”

दरम्यान प्रकाश राज यांची ‘मुखबिर’ ही वेब सिरीज 11 नोव्हेंबरला ‘झी5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. शिवम नायर आणि जयप्रद देसाई यांनी या सिरीजचे दिग्दर्शन केलं आहे. या सिरीजमध्ये त्यांच्याबरोबर जैन खान दुर्रानी आणि आदिल हुसेन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash raj expressed his views about bollywood mafiya rnv