प्रभासचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपट आज (१६ जून रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. मात्र, जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटात वापरण्यात आलेल्या VFX वरून मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटातील स्पेशल इफेक्ट आणि व्हीएफएक्स याबाबतीत नेटकऱ्यांनी चित्रपट निर्मात्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. ‘आदिपुरुष’च्या व्हिज्युअल इफेक्ट्सची निर्मिती प्रसाद सुतार यांनी केली आहे. पण ‘आदिपुरुष’सारख्या बिग बजेट चित्रपटासाठी वादग्रस्त VFX ची निर्मिती करणारे प्रसाद सुतार आहेत तरी कोण? घ्या जाणून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- Adipurush : ५०० कोटींचं बजेट असलेला ‘आदिपुरुष’ प्रदर्शनाच्या दिवशीच ऑनलाइन झाला लीक, चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होणार का?

प्रसाद सुतार हे दिग्गज व्हिज्युअल इफेक्ट डिझायनर आहेत. या क्षेत्रात त्यांना २५ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी ‘तान्हाजी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘डॉन २’ आणि ‘राजनीती’ यांसारख्या चित्रपटांमधील व्हीएफएक्स बनवण्याचे काम केले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९९८ च्या ‘गुलाम’ चित्रपटातून केली होती. या चित्रपटात त्यांनी आमिर खानने धावत्या रेल्वेसमोर उडी मारल्याचे दृश्य तयार केले होते. गेल्या काही वर्षांत, त्यांनी अनेक भाषांमधील जवळपास १५० चित्रपटांच्या VFX ची निर्मिती केली आहे.

प्रसाद यांनी २०१५ मध्ये VFX पर्यवेक्षक नवीन पॉल यांच्याबरोबर भागीदारीत ‘NY VFXwaala नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. यासाठी त्यांना अजय देवगणच्या प्रॉडक्शन हाऊसनेही मदत केली होती. या कंपनीने ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘तान्हाजी’ चित्रपटासाठी स्पेशल इफेक्ट्सची निर्मिती केली होती. या दोन्ही चित्रपटांसाठी प्रसाद यांना झी सिने पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

हेही वाचा- ‘आदिपुरुष’मध्ये सीतेबद्दलच्या ‘त्या’ दाव्यावरून नेपाळमध्ये वाद; काठमांडूचे महापौर दिग्दर्शक ओम राऊतला इशारा देत म्हणाले…

‘आदिपुरुष’मधील व्हीएफएक्सवरून सुरू असलेल्या वादानंतर व्हीएफएक्स कंपनीने स्पष्टीकरण दिले होते. कंपनीने निवेदनात म्हटले होते की ‘NY VFXwaala हे स्पष्ट करीत आहे की आम्ही ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी कोणतेही स्पेशल इफेक्ट्स दिलेले नाहीत. माध्यमातील काही लोकांनी आमच्याकडे ही विचारणा केली म्हणून आम्ही हे अधिकृतपणे घोषित करीत आहोत.’ याबाबतीत नेमका काय प्रकार आहे हे काही दिवसांत समोर येईलच, मात्र व्हीएफएक्सवरून चित्रपटाला चांगलाच टीकेचा सामना करावा लागत आहे.”

हेही वाचा- “रावण अली खिलजी, प्रभू येशू, उर्फी जावेद अन्…”, ‘आदिपुरुष’ पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, “ओम राऊत तू…”

दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम् आणि कन्नडमध्ये टू डी आणि थ्रीडीमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रभास भगवान राम, क्रिती सेनॉन सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहेत. यामध्ये सनी सिंगने लक्ष्मणाची तर देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे.