स्मिता पाटील व राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर मॉडेल प्रिया बॅनर्जीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांच्या नात्याला तीन वर्षे झाली आहेत. हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. या दोघांनी २०२३ च्या व्हॅलेंटाइन डे ला इन्स्टाग्रामवर नातं अधिकृत केलं होतं. आता दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतीक बब्बरचं हे दुसरं लग्न असेल. त्याने पहिलं लग्न सान्या सागरशी २०१९ मध्ये केलं होतं आणि २०२३ मध्ये त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. प्रतीक आणि प्रिया यांच्यासाठी नवीन सुरुवात झाली आहे. ते लवकरच लग्न करणार असल्याची माहिती आहे. या जोडप्याच्या जवळच्या एका स्रोताने ई-टाइम्सला सांगितलं की प्रतीकने प्रियाला लग्नाबद्दल विचारलं आणि तिने २६ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘होय’ म्हटलं आहे.

“तो सतत खोटं बोलत होता आणि…”, प्राजक्ता माळीचा ‘त्या’ रिलेशनशिपबद्दल खुलासा; म्हणाली, “त्याचे पुरावे…”

“त्याच्या वाढदिवसाच्या फक्त दोन दिवस आधी तिने लग्नास होकार दिला. प्रतीकने गुडघ्यावर बसून प्रियाला प्रपोज केलं आणि तिने होकार दिला. आम्ही सगळे मित्र लग्नाची आतुरतेने वाट पाहतोय” असं सूत्राने सांगितलं. प्रिया व प्रतीक साखरपुडा करणार नाहीत, तर थेट लग्न करतील असंही सूत्राने सांगितल्याचं वृत्त आहे. पण याबाबत अद्याप प्रतीक किंवा प्रियाने अधिकृत माहिती दिलेली नाही.

“ती रस्त्यावर नव्हती…”, खर्चाच्या विधानावरून अभिनेत्रीने अंकिता लोखंडेच्या सासूला सुनावलं; म्हणाली, “दोन दिवसात…”

प्रतीक प्रियाबद्दल काय म्हणाला होता?

“मी खूप भाग्यवान आहे की प्रिया माझ्या आयुष्यात आली. माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, पण माझ्या आयुष्यात अशी अद्भुत स्त्री आली, यासाठी मी आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असेल. माझा घटस्फोट झाला आणि प्रियानेही तिचा साखरपुडा मोडला होता. त्याच काळात २०२० मध्ये मेसेजवर आमचं बोलणं सुरू झालं. माझ्या घटस्फोटामुळे मी सुरुवातीला संकोच करत होतो पण आता मात्र ती माझं घर आहे. मला तिचं वेड आहे,” असं प्रतीक प्रियाबाबत म्हणाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prateik babbar and priya banerjee will marry soon according to reports hrc