दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. प्रतीकने चार वर्षांपूर्वी सान्या सागरशी लग्न केलं होतं, पण नंतर त्याचा घटस्फोट झाला. ते लग्न का टिकलं नाही, याबाबत प्रतीकने खुलासा केला आहे. तसेच त्याने त्याची सध्याची गर्लफ्रेंड प्रिया चॅटर्जीबरोबरच्या नात्यावरही भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतीक बब्बरने जानेवारी २०२३ मध्ये सान्या सागरपासून घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर तो प्रिया बॅनर्जीच्या प्रेमात पडला. सान्याशी घटस्फोट होण्याचं कारण प्रतीकने ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं. “आम्ही प्रेमात होतो म्हणूनच आम्ही लग्न केलं होतं. मला त्या नात्याबद्दल आदर आहे. पण आम्ही दोघेही एकमेकांपेक्षा खूप वेगळे होतो. आम्ही एकमेकांना खूप समजून न घेता निर्णय घेतला. तुम्ही लग्नाचे निर्णय घेताना एकमेकांना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही घाईत लग्न केलं होतं, आमच्यावर कौटुंबिक दबाव होता. मी तेव्हा ३२ वर्षांचा होतो आणि मला ३५ व्या वर्षांपर्यंत मुलं हवी होती,” असं प्रतीकने सांगितलं.

२० व्या वर्षी लग्न, १८ वर्षांची मुलगी अन् १९ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट; मराठमोळी अभिनेत्री करणार दुसरं लग्न? म्हणाली…

प्रतीक म्हणाला, “हे खूप धक्कादायक होतं. मी खूप पूर्णपणे गोंधळलो होतो. मी सर्व चुकीच्या कारणांसाठी लग्न केलं होतं. आम्हाला वाटलं की आम्ही एकत्र सगळ्या गोष्टींवर तोडगा शोधू. पण असं होत नाही, तुम्हाला आधीच एकमेकांबद्दल सगळं समजून घ्यावं लागतं. भावनिक निराशेमुळे मी वाईट निर्णय घेतले. मला वाटलं की माझ्या वैवाहिक जीवनात विश्वासघात झाला. पण ते लग्न अयशस्वी झालं नसतं, तर आज मी माझ्या आयुष्यात प्रियाला भेटलो नसतो.”

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांचं मराठी ऐकलंत का? म्हणाले, “माझं मराठी…”

प्रतीक बब्बर सध्या प्रिया बॅनर्जीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. “मी खूप भाग्यवान आहे की प्रिया माझ्या आयुष्यात आली. माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, पण माझ्या आयुष्यात अशी अद्भुत स्त्री आली, यासाठी मी आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असेल. माझा घटस्फोट झाला आणि प्रियानेही तिचा साखरपुडा मोडला होता. त्याच काळात २०२० मध्ये मेसेजवर आमचं बोलणं सुरू झालं. माझ्या घटस्फोटामुळे मी सुरुवातीला संकोच करत होतो पण आता मात्र ती माझं घर आहे. मला तिचं वेड आहे,” असं प्रतीक म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prateik babbar reveals divorce reason with sanya sagar talks about girlfriend priya banerjee hrc