Sushant Singh Rajput Dream : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला साडेचार वर्षं झाली आहेत; परंतु त्याचे चाहते आजही त्याच्या आठवणींमध्ये रमलेले आहेत. त्यांच्याकडून त्याच्या मृत्यूच्या चौकशीची आणि त्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली जात असते. नुकताच अभिनेता प्रतीक बब्बरनं सुशांतविषयी एक खुलासा केला आहे. प्रतीक बब्बरनं सुशांतबरोबर २०१९ मध्ये आलेल्या ‘छिछोरे’ चित्रपटात काम केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) १४ जून २०२० रोजी त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे, हे अद्याप कुणालाच कळू शकलेलं नाही. काही जणांनी त्याच्या मृत्यूला आत्महत्या म्हंटलं, तर काहींनी हत्या. त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली होती, परंतु त्याचे चाहते आणि कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सुशांतच्या मृत्यूआधी त्याचे ‘छिछोरे’, ‘ड्राइव्ह’ हे दोन सिनेमे आले होते. त्यापैकी ‘छिछोरे’ या सिनेमात प्रतीक बब्बरनं सुशांतबरोबर काम केलं होत. याच सिनेमाच्या सेटवर सुशांतनं प्रतीकला त्याची एक इच्छा सांगितली होती.

हेही वाचा…“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…

बास्केटबॉलच्या सीनदरम्यान सुशांतने सांगितली होती इच्छा : प्रतीक बब्बर

प्रतीक बब्बरनं (Prateik Babbar) ‘फिल्मीग्यान’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘छिछोरे’च्या शूटिंगदरम्यान सुशांतनं त्याला एकट्याला अंटार्क्टिका दौरा करायचा आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. प्रतीक आणि सुशांत फारसे जवळचे मित्र नव्हते; पण ‘छिछोरे’ सिनेमात बास्केटबॉलचा एक सीन शूट करताना दोघांमध्ये संवाद झाला होता.

हेही वाचा…वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”

प्रतीक म्हणाला, “सुशांत थोडा वेगळा होता. त्यानं म्हटलं होतं, ‘यार, मी ना शूट संपल्यानंतर अंटार्क्टिकाला जाणार आहे.” २०१९ मध्ये सुशांतनं आपल्या ५० स्वप्नांची यादी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यात विमान उडवण्यापासून लेफ्ट हॅण्डेड क्रिकेट खेळण्यापर्यंत आणि मुलांना अंतराळाच्या गोष्टी शिकवण्याची स्वप्नं त्यानं मांडली होती. दुर्दैवानं सुशांत त्यापैकी फक्त १३ स्वप्नंच पूर्ण करू शकला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prateik babbar reveals sushant singh rajput dream to visit antarctica psg