Pratibha Ranta Opened up About Menstruation : मासिक पाळी, सॅनिटरी पॅड्स, पीरेड्सदरम्यान महिलांचं आरोग्य या सगळ्या गोष्टींवर पूर्वीच्या काळात उघडपणे चर्चा होत नव्हती. मात्र, अलीकडच्या काळात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. महिलांचं आरोग्य, मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता याबद्दल आता शाळेतच माहिती दिली जाते. मुलींप्रमाणे मुलांसुद्धा या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या जातात. असाच एक अनुभव लोकप्रिय अभिनेत्री प्रतिभा रातांला आला होता. याबद्दल तिने नुकत्याच hauterrfly ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतिभा रांता ( Pratibha Ranta ) म्हणाली, “टेलिव्हिजनवर काम केल्यामुले मला माझ्या मूळ गावात खूप प्रसिद्धी मिळाली. माझा शो गावी सगळे लोक पाहायचे. हिमाचलमधून येऊन मुंबईत आपली ओळख बनवायची हे खरंच खूप जास्त कठीण होतं. पण, माझ्या कुटुंबीयांनी मला कायम साथ दिली आणि महत्त्वाचं म्हणजे, आमच्या घरातल्या सगळ्या स्त्रियांना कायम स्वत:चे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळालं.”

हेही वाचा : “बिश्नोई समाजात काळवीटांची पूजा करतात हे त्याला…”, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा दावा; म्हणाली, “तो खूप दयाळू…”

अभिनेत्रीला ( Pratibha Ranta ) यानंतर “तुला मासिक पाळीबद्दलची माहिती कुठून मिळाली?” असा प्रश्न विचारण्यात आला यावर प्रतिभा म्हणाली, “आमच्या शाळेत सगळ्या गोष्टींची खूप चांगली माहिती दिली जायची. आमची फक्त मुलींची शाळा होती आणि माझा पहिला बॉयफ्रेंड फक्त मुलांसाठी राखीव असणाऱ्या शाळेत शिक्षण घेत होता. म्हणजे मी त्याची पहिली मैत्रीण होते आणि तो माझा पहिला मित्र… एके दिवशी मी डान्स क्लासवरून घरी जात होते आणि मला तो वाटेत दिसला. मला मासिक पाळी आली असल्याने मी थोडी तणावात होते.”

प्रतिभा पुढे म्हणाली, “मला वाटेत तो भेटला आणि मी त्याला सांगितलं ऐक, आपण थोडं हळू चालूयात मला पीरेड्स आलेत. मी जास्त चालू शकणार नाही. मासिक पाळीबद्दल ऐकल्यावर तो थोडा पॅनिक झाला. पहिल्यांदाच त्याच्याबरोबर कोणीतरी एवढं मनमोकळेपणाने मासिक पाळीबद्दल बोलत होतं. यानंतर तो मला मासिक पाळी का येते, किती दिवस रक्तस्त्राव होतो या सगळ्या गोष्टी पुस्तकी भाषेत सांगू लागला. मी थोडी हसून म्हणाले, हो मला माहितीये”

हेही वाचा : प्रियांका चोप्राबरोबर अफेअरच्या चर्चा; पत्नी ट्विंकल घर सोडून गेल्यावर अक्षय कुमारने घेतलेला मोठा निर्णय, २००५ मध्ये नेमकं काय घडलेलं?

प्रतिभा रांता ( Pratibha Ranta )

“मासिका पाळीबद्दलच्या या संवादानंतर आमच्यात एक कन्फर्टझोन तयार झाला. त्याने मला सांगितलं, ‘मी आजवर सॅनिटरी पॅड पाहिलेलं नाहीये. तू मला सॅनिटरी पॅड दाखवशील का? माझी आई या सगळ्या गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवते.’ यावर मी त्याला म्हणाले, माझ्याकडे एक एक्स्ट्रा पॅड आहे मी तुला दाखवते. मी बॅगेतून पॅड काढलं आणि त्याला दिलं. मला यात काहीच चुकीचं वाटलं नाही. कारण, त्या क्षणाला मला जाणवलं मुलांना या गोष्टींची पुस्तकी माहिती असते पण, त्यांच्यात समजूतदारपणा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर येतो. अनुभवातून माणूस जास्त शिकतो.” असा अनुभव सांगत प्रतिभा रांताने ( Pratibha Ranta ) या सगळ्या विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला पाहिजे असं मत मांडलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratibha ranta open up about menstruation her boyfriend asked to show sanitary pads sva 00