बॉलीवूड अभिनेता प्रतीक गांधीने अभिनेत्री विद्या बालनबरोबर रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘दो और दो प्यार’मध्ये काम केलं होतं. या चित्रपटात त्याने विद्याच्या पतीची भूमिका केली होती. चित्रपटात विद्या व प्रतीकचे अनेक किसिंग व इंटिमेट सीन होते. प्रतीकने या सीनच्या शूटिंगबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेहरेनला दिलेल्या मुलाखतीत, प्रतीकने चित्रपटातील त्याच्या व विद्याच्या किसिंग सीनबद्दल भाष्य केलं. तसेच हे सीन शूट करताना विद्याने त्याला या सीनच्या शूटिंगदरम्यान कम्फर्टेबल होण्यास कशी मदत केली, त्याबद्दल खुलासा केला. प्रतीक गांधीच्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच त्याने विद्याबरोबर या सिनेमात ऑन-स्क्रीन किसिंग सीन दिले.

विद्या बालनसोबत काम करण्याचा अनुभव सांगताना प्रतीक म्हणाला, “मी सीन शूट करण्यापूर्वी विचारलं होतं की कोणतीही गोष्ट दाखवण्याचे अनेक पर्याय असतात. तुम्ही मला सांगा आणि मी तुम्हाला काही वेगळे पर्याय देऊ शकतो. पण तिला स्क्रीनवर काय आणि कसं दाखवायचे आहे याबद्दल ती खूप स्पष्ट होती. मी यापूर्वी कधीही किसिंग सीन केले नव्हते. मात्र, तिने ज्या पद्धतीने हे सगळं हाताळलं ते उत्तम होतं. एक दिग्गज कलाकार म्हणून तो सीन चांगला करणं आणि बिघडवणं पूर्णपणे तिच्या हातात होतं.”

विद्या बालनच्या स्वभावाचे कौतुक करताना प्रतीक म्हणाला की ती खूप चांगली व्यक्ती आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती सतत वातावरण हलकं- फुलकं ठेवण्यासाठी काही ना काही करत असायची. यामुळेच आम्ही तो सीन पूर्णपणे हसत शूट केला, असंही त्याने सांगितलं.

दरम्यान, ‘दो और दो प्यार’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट होता. यात विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंधिल राममूर्ती हे महत्त्वाच्या भूमिकेत होते. यात विद्या व प्रतीक दोघेही पती पत्नी असतात, नात्यात आलेल्या दुराव्यानंतर ते दोघेही अफेअर करतात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात जे प्रसंग घडतात, त्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. चित्रपटाने फक्त ५.५ कोटी रुपयांची कमाई केली होती. प्रतीक गांधीबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच ‘धूम धाम’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात यामी गौतम, प्रतीक बब्बर व एजाज खानदेखील आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratik gandhi recalls first kissing scene with actress vidya balan in do aur do pyaar hrc