बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी ओळख असणारी इलियाना डिक्रुझ सध्या चांगलीच चर्चेत आहे. इलियाना लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल गुडन्यूज दिली होती. आता तिने तिच्या बॉयफ्रेंडचा एक खास फोटो शेअर करत त्याच्याबद्दल खुलासा केला आहे.

इलियाना ही सध्या परदेशात आहे. सध्या ती तिचं गरोदरपण चांगलंच एन्जॉय करताना दिसत आहे. गरोदरपणाच्या घोषणेनंतर इलियाना ही सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना अपडेट देताना दिसत आहे. नुकतंच इलियानाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. या तिने तिच्या बॉयफ्रेंडचा एक खास फोटो पोस्ट केला आहे. तसेच तिने याला रोमँटिक कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

इलियानाने शेअर केलेल्या या फोटोत ते दोघेही परदेशातील एका हॉटेलमध्ये बसल्याचे दिसत आहे. यावेळी इलियाना ही फारच आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील एका फोटोत इलियाना त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली आहे. तर एका फोटोत ते दोघेही हसताना दिसत आहेत.

तर एका फोटोत ते दोघेही एकमेकांकडे रोमँटिक पद्धतीने पाहताना दिसत आहे. इलियानाने या फोटोला कॅप्शन देताना डेट नाईट असे म्हटले आहे. त्याबरोबर तिने हार्ट इमोजीही शेअर केला आहे.

Ileana D'cruz Boyfriend Photo
इलियाना डिक्रुझ

आणखी वाचा : “या बाळाचे वडील कोण?” अविवाहित इलियाना डिक्रुझने ती आई होणार असल्याचं जाहीर करताच नेटकऱ्यांना पडला प्रश्न; म्हणाले…

इलियानाने शेअर केलेला हा फोटो आता चांगलाच व्हायरल होत आहे. इलियानाने पहिल्यांदाच तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवला आहे. तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो पाहून चाहते आनंदी झाले आहेत. विशेष म्हणजे तिने शेअर केलेल्या या फोटोमुळे हाच तिच्या बाळाचा बाबा आहे का? अशी चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप तिने याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.

Story img Loader