अभिनेत्री प्रीती झिंटाने काल (२७ डिसेंबर २०२४) ला सोशल मीडियावर सलमान खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याच पोस्टबरोबर प्रीतीने तिचे आणि सलमानचे काही जुने फोटो पोस्ट केले आहेत. प्रीती झिंटाने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर हे फोटो पोस्ट केले.

या फोटोंमध्ये, ते दोघे हसताना आणि एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. एका फोटोत त्यांचा एका चित्रपटातील सीनही दिसतो. शेवटच्या फोटोत, दोघे टेबलावर पाय ठेवून पोझ करताना दिसतात. प्रीतीने हे फोटो पोस्ट करत लिहिले, “हॅपी बर्डे सलमान . फक्त एवढंच सांगायचं आहे की, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे . उर्वरित गोष्टी तुझ्याशी बोलताना सांगेन…आणि हो, आपल्याला अजून फोटोज काढले पाहिजेत नाहीतर मी हेच जुने फोटो पोस्ट करत राहीन!”

suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mika Singh Removed Katrina Kaif name on Salman Khan request
“सलमान खानच्या विनंतीवरून कतरिना कैफचे नाव…”, मिका सिंगचा खुलासा; म्हणाला, “रात्री २ वाजता फोनवर…”
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली नाही’, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या मागणीवर प्रणव मुखर्जींच्या लेकीचा संताप
ameya khopkar slams suresh dhas over prajakta mali
“तुमच्या गलिच्छ राजकारणात…”, अमेय खोपकरांची प्राजक्ता माळीचं नाव घेणाऱ्या सुरेश धस यांच्यावर टीका; म्हणाले, “हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे…”
urmila kothare car accident video
मोठी बातमी! अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू; घटनास्थळावरील व्हिडीओ आला समोर
Sandeep Kshirsagar on Viral Photo
Sandeep Kshirsagar: तरुणीबरोबरच्या त्या व्हायरल फोटोवर आमदार संदीप क्षीरसागर यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “तो फोटो…”
hansal mehta anupam kher dispute
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मुळे रंगला वाद; हंसल मेहता यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर भडकले अनुपम खेर

हेही वाचा…मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मुळे रंगला वाद; हंसल मेहता यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर भडकले अनुपम खेर

एका युजरने या पोस्टवर प्रीतीला विचारले, “तुम्ही दोघं कधी डेट केलं होतं का?” यावर प्रितीने उत्तर दिलं, “नाही, अजिबात नाही! तो माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि माझा मित्र आहे. तो माझ्या पतीचा मित्रही आहे….”

सलमान आणि प्रीतीचे चित्रपट

प्रीती आणि सलमानने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये ‘हर दिल जो प्यार करेगा’ (२०००), ‘चोरी चोरी चुपके चुपके’ (२००१), ‘दिल ने जिसे अपना कहा’ (२००४), ‘जान-ए-मन’ (२००६), आणि ‘हिरोज’ (२००८) यांचा समावेश आहे.

हेही वाचा…“जेव्हा तुम्ही तरुण, देखणे असता पण तुमच्याकडे…”; प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाला…

प्रीतीचे आगामी चित्रपट

प्रीती लवकरच ‘लाहोर १९४७’ या राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. हा चित्रपट प्रीतीच्या करिअरमधील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे, कारण ती बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतत आहे. ‘लाहोर १९४७’ आमिर खान प्रोडक्शन्स अंतर्गत तयार होणारा चित्रपट आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा गेल्या ऑक्टोबरमध्ये करण्यात आली होती आणि याच्या तगड्या कास्टमुळे हा चर्चेत आहे. शबाना आझमी, अली फजल, सनी देओल आणि त्याचा मुलगा करण देओल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

Story img Loader