अभिनेत्री प्रीती झिंटा तिच्या लग्नानंतर अमेरिकेत राहत असली तरी ती अनेकदा भारतात येत असते. या दोन्ही देशात ती सतत प्रवास करत असते. तिने लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक असलेल्या आर्थिक विश्लेषक जीन गुडएनफबरोबर लग्नगाठ बांधली आहे. प्रीतीने सध्या लॉस एंजेलिसमध्ये जंगलाला लागलेल्या विनाशकारी आगीच्या पार्श्वभूमीवर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर तिने अपडेट शेअर करत सांगितले की, “मी आणि माझं कुटुंब सध्या तरी सुरक्षित आहोत.”
प्रीतीने पुढे लिहिले, “माझ्या मित्र-परिवाराला हलवण्यात आलं आहे किंवा त्यांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. धुरकट आकाशातून बर्फासारखी राख खाली पडतेय. वाऱ्याचा जोर कमी नाही झाला, तर काय होईल, याची भीती आहे. लहान मुलं आणि वयोवृद्धांबरोबर आम्ही या परिस्थितीचा सामना करत आहोत.”
तिने पुढे लिहिले, “आमच्या सभोवतीच्या विध्वंसामुळे मी निराश आहे, पण देवाचे आभार की आम्ही सध्या तरी सुरक्षित आहोत. ज्यांनी या आगीत आपलं सर्वस्व गमावलं आहे, त्यांच्यासाठी माझ्या प्रार्थना आहेत. लवकरच वारा शांत होईल आणि आग विझवली जाईल, अशी आशा आहे. अग्निशामक विभाग, अग्निशामक कर्मचारी आणि आगीत अडकलेल्या अनेकांचे जीव वाचवण्यासाठी मेहनत करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार. सर्वांनी काळजी घ्या.”
I never thought I would live to see a day where fires would ravage neighbourhoods around us in La, friends & families either evacuated or put on high alert, ash descending from smoggy skies like snow & fear & uncertainty about what will happen if the wind does not calm down with…
— Preity G Zinta (@realpreityzinta) January 11, 2025
९ जानेवारीला २०२४ ला प्रियंका चोप्रानेही सोशल मीडियावर पोस्ट करून लॉस एंजेलिस येथील जंगलात लागलेल्या आगीविरोधात काम करणाऱ्या धाडसी बचाव पथकांचे आभार मानले. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ती म्हणाली, “रात्रभर काम करणाऱ्या आणि पीडितांना मदत करणाऱ्या धाडसी बचाव पथकांना सलाम. तुमच्या अथक प्रयत्नांसाठी मनःपूर्वक धन्यवाद. .”
हेही वाचा…चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळणे आवश्यक; गीतकार, सिनेलेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
प्रियंकाने याआधी लॉस एंजेलिसमधील जंगल आगीचे दृश्य दाखवणारा व्हिडीओही शेअर केला होता. याच आगीमुळे अभिनेत्री नोरा फतेहीला ९ जानेवारी २०२४ ला कॅलिफोर्निया सोडावे लागले.
७ जानेवारी २०२५ रोजी लागलेल्या या मोठ्या जंगलातील आगीमुळे ३०,००० हून अधिक रहिवाशांना आपली घरे सोडावी लागली आहेत. त्यानंतर कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजम यांनी लॉस एंजेलिसमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे.