Pritish Nandy : पत्रकारिता करुन चित्रपट निर्माते, लेखक तसंच दिग्दर्शक झालेल्या प्रीतीश नंदी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिनेनिर्माते कुशन नंदी यांचे ते सुपुत्र होते. अभिनेते अनुपम खेर यांनी प्रीतीश नंदी यांच्या निधनाबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. प्रीतीश नंदी हे उत्तम कवीही होते. अनुपम खेर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनुपम खेर यांची पोस्ट काय?

माझा खूप जवळचा मित्र असलेला प्रीतीश नंदी याच्या निधनाचं वृत्त ऐकून मला धक्का बसला आहे. तसंच अतीव दुःख झालं आहे. एक अद्भुत कवी, लेखक तसंच साहसी संपादक आणि पत्रकार मित्र आपण गमावला आहे. मुंबईत मी जेव्हा आलो तेव्हा प्रीतीश माझी सपोर्ट सिस्टिम आणि ताकद यांचा मोठा स्रोत होता. या आशयाची पोस्ट अनुपम खेर यांनी केली आहे.

कोण होते प्रीतीश नंदी?

प्रीतीश नंदी हे एक उत्तम कवी, लेखक, पत्रकार आणि संपादक होते, तसंच त्यांनी चित्रपटांची निर्मितीही केली होती. १५ जानेवारी १९५१ या दिवशी प्रीतीश नंदी यांचा जन्म झाला होता. द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया चे ते संपादक होते. साहित्य आणि पत्रकारिता त्यांच्या आवडीचे विषय होते. चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रातही त्यांनी चांगलं यश मिळवलं. त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्या आलं होतं. प्रीतीश नंदी यांनी चमेली, झंकार बीट्स, हजारो ख्वाहिशे ऐसी, अग्ली और पगली, रात गई बात गई, शादी के साईड इफेक्ट्स या चित्रपटांची निर्मिती केली होती.

भाषांतरांसाठीही प्रसिद्ध होते प्रीतीश नंदी

प्रितिश नंदी हे पत्रकार आणि समाजसेवकही होते. नंदी यांनी १९९० च्या दशकात दूरदर्शनवरील ‘प्रितिश नंदी शो’ नावाचा टॉक शो देखील होस्ट केला होता. त्यात ते सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत असत. कवी ,चित्रकार, पत्रकार, संसदपटू, मीडिया आणि दूरदर्शन आदीत त्यांनी मोठे काम केले होते. ते महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार होते. शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेवर ते निवडून गेले होते. त्यांच्या कवितांची इंग्रजी भाषेतील चाळीसहून अधिक पुस्तके आहेत. त्यांनी बंगाली, उर्दू आणि पंजाबी भाषेतील इतर लेखकांच्या कविता तसेच उपनिषदच्या नवीन आवृत्तीचे भाषांतर केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pritish nandy passes away anupam kher remembers his fearless friend always larger than life scj