प्रियांका चोप्राचा धाकटा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लग्नबंधनात अडकणार आहे. सिद्धार्थच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सुरू आहेत. गुरुवारी त्याचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्या प्रियांका चोप्रा व तिचा पती गायक निक जोनासने हजेरी लावली. प्रियांका व निकने सिद्धार्थ व त्याच्या होणाऱ्या बायकोबरोबर पापाराझींना पोज दिल्या, यावेळी अभिनेत्रीने केलेल्या एका कृतीने लक्ष वेधून घेतले आहे.
प्रियांका चोप्राच्या होणाऱ्या वहिनीचे नाव नीलम उपाध्याय आहे. संगीत सोहळ्यासाठी नीलम, सिद्धार्थ, प्रियांका व निक एकत्र पोहोचले. हे चौघेही एकत्र फोटोसाठी पोज देणार होते. तेवढ्यात प्रियांका होणारी वहिनी नीलमचा लाँग टेल ड्रेस नीट करते आणि नंतर ते चौघेही फोटोसाठी पोज देतात. प्रियांकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ
प्रियांचा चोप्राच्या भावाच्या संगीत सोहळ्यातील हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी रेड हार्ट इमोजी कमेंट्स केले आहेत. तर काहींनी प्रियांकाला अजिबात अॅटिट्यूड नसल्याचं म्हटलं आहे. प्रियांका चोप्रा धाकट्या बहिणीसारखी तिची काळजी घेतेय, कारण तिला बहीण नाही, असं एका युजरने लिहिलं आहे.
नीलम व सिद्धार्थ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचा मेहंदी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर हळदी समारंभ झाला. या हळदी समारंभाला परिणीती चोप्राचे आई-वडील, मनारा चोप्रा व तिचे कुटुंबीय उपस्थित होते.
लोकप्रिय अभिनेत्री आहे प्रियांका चोप्राची होणारी वहिनी
प्रियांका चोप्राची होणारी वहिनी नीलम ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने अनेक तेलुगू व तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नीलम ३१ वर्षांची असून तिने अॅक्शन थ्रीडी, ओन्नाडू ओरू नाल, पंदगला वाचाडू, मेरा कर्तव्य माय ड्यूटी अशा सिनेमात तिने काम केलं आहे. नीलम व सिद्धार्थ मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांनी रोका सेरेमनी केली. त्यासाठी प्रियांका चोप्रा व निक जोनास भारतात आले होते.