बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ते दोघेही येत्या ६ एप्रिल २०२३ ला विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. या चर्चांमध्येच आता परिणिती चोप्राची बहिण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही भारतात परतली आहे. ती तिचा पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी चोप्रा यांच्याबरोबर भारतात परतली आहे. तिचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात प्रियांकाने गुलाबी रंगाचा वनपीस परिधान केला आहे. तर निक जोनस हा हुडी, जिन्स आणि कॅप घालून उभा आहे. तर प्रियांकाने लेकीला छानसा फ्रॉक घातला आहे. यावेळी प्रियांका ही खूपच आनंदात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे प्रियांकाची लेक मालतीच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

प्रियांका ही भारतात तिचा आगामी चित्रपट ‘सिटाडेल’चे प्रमोशन करण्यासाठी आल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे प्रियांका ही तिची बहिण परिणिती चोप्राच्या लग्नासाठी आल्याचं बोललं जात आहे. पण ती नेमकी कोणत्या कारणासाठी भारतात आली आहे, याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

तिच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी तिला परिणीती चोप्राबद्दल विचारले आहे. ‘तू परिणीतीच्या लग्नासाठी आलीस का?’ असा प्रश्न तिला एकाने विचारला आहे. तर एकाने ‘परिणीती चोप्राचा साखरपुडा ठरलाय’, अशी कमेंट केली आहे.

तर दुसरीकडे परिणिती चोप्रा ही दिल्लीत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती मोमोज खाताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी परिणीतीही मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. त्यावेळी तिने लग्नाच्या चर्चांवर लाजत प्रतिक्रिया दिली होती.

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा हे दोघेही येत्या ६ एप्रिल २०२३ ला विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. पण अद्याप याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra and nick jonas daughter malti marie first visit to india fans comment for parineeti chopra wedding nrp