अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. बॉलीवूड गाजवल्यानंतर प्रियांकाने हॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. बॉलीवूड व हॉलीवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये प्रियांकाचे नाव घेतले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रियांकाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्मण केले आहे. २०१८ प्रियांकाने प्रसिद्ध हॉलीवूड गायक निक जोनासबरोबर लग्नगाठ बांधली. नुकतेच प्रियांका व नीकने त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला. दरम्यान लग्नाच्या सहा वर्षानंतर प्रियांका व निकच्या प्री वेडिंग कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
फोटोमध्ये प्रियांका व निक खूप आनंदी असल्याचे दिसत आहे. लग्नाअगोदर प्रियांकाच्या घरी पूजाही ठेवण्यात आली होती. यावेळी प्रियांकाने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता तर निकने गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती. एवढचं नाही तर या कार्यक्रमात निकने ढोलही वाजवला.
प्रियांका व नीकचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, “ते खूप सुंदर दिसत आहेत, दोघांनी हे फोटो आमच्यापासून का लपवले?” आणखी एका युजरने लिहिले की, “हे खूप चांगले फोटो आहेत, मी पहिल्यांदाच पाहत आहे”. दुसऱ्या युजरने लिहिले, “मला वाटत नाही की मी हे फोटो याआधी पाहिले आहेत. निक इतका क्यूट दिसत आहे.”
२०१८ साली प्रियांका- निकने बांधली लग्नगाठ
प्रियांका चोप्राने २०१८ साली हॉलिवूडचा गायक निक जोनासबरोबर लग्नगाठ बांधली. उदयपूरमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन परंपरेने लग्न केले. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या लग्नात तब्बल ३ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.