ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राने १ डिसेंबर २०१८ रोजी हॉलीवूड गायक निक जोनसशी विवाह केला. लग्नानंतर अभिनेत्री आपल्या पतीसह परदेशात स्थायिक झाली. त्यामुळे प्रियांका भारतात येणं ही तिच्या प्रत्येक चाहत्यासाठी आनंदाची बातमी असते. सध्या अंबानीच्या घरच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. या सोहळ्याचं देसी गर्लला सुद्धा खास निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. गुरुवारी ( ११ जुलै ) सायंकाळी आपल्या पतीसह प्रियांका मुंबई दाखल झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांकाला मुंबई विमानतळावर पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. शुक्रवारी सायंकाळी लग्नसोहळ्याला सुरुवात झाल्यापासून प्रत्येकजण देसी गर्लची आतुरतेने वाट पाहत होता. अशातच पिवळ्या रंगाचा भरजरी लेहेंगा घालून प्रियांकाने अंबानींच्या लग्नमंडपात पती निक जोनससह अभिनेत्रीने एन्ट्री घेतली. यावेळी निकने बेबी पिंक रंगाची शेरवानी घातली होती. या दोघांनी पापाराझींसमोर एकत्र फोटोसाठी पोज दिल्या. पण, या सगळ्यात निकच्या एका कृतीने प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : Video : नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर, नथ अन्…; अंबानींच्या लग्नसोहळ्यात देशमुखांच्या सुनेची चर्चा! रितेशसह घेतली एन्ट्री

फोटोसाठी पोज देण्याआधी निकने प्रियांकाचा लेहेंगा व्यवस्थित आहे की नाही याची खात्री केली. लेहेंग्यावर पडलेली घडी नीट केली. त्यानंतर या जोडप्याने एकत्र फोटो काढले. प्रियांका व निकचं हे प्रेम पाहून सगळेजण भारावून गेले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे. निकचं या कृतीचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

प्रियांकाने सर्व पापाराझींना हात जोडून नमस्कार केला. अनेक महिन्यांनी भारतात परतलेल्या देसी गर्लने सर्वांशी मिळून मिसळून संवाद साधला. प्रियांका खास अनंत – राधिकाच्या लग्नासाठी मुंबईला आली आहे. हा लग्नसोहळा पार पडल्यावर ती पुन्हा एकदा न्यूयॉर्कला रवाना होणार आहे.

हेही वाचा : Video : धोतर, डोक्यावर टोपी अन्…; अनंत-राधिकाच्या लग्नातील जॅकी श्रॉफ यांच्या हटके लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा : Video : अखेर तो क्षण आलाच! लग्नमंडपात अंबानी कुटुंबाची रॉयल एन्ट्री, मुलाच्या लग्नात वरमाई नीता अंबानींचा उत्साह

दरम्यान, यापूर्वी अयोध्येत राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी प्रियांका मार्च महिन्यात भारतात आली होती. यावेळी तिच्याबरोबर लेक मालती देखील उपस्थित होती. जानेवारी महिन्यात अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. यावेळी प्रियांका चोप्रा गैरहजर होती. त्यामुळे मार्च महिन्यात भारतात येऊन तिने कुटुंबीयांसह राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra attend anant ambani wedding with husband nick jonas in desi look sva 00