बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा मोठा दीर जो जोनस आणि त्याची पत्नी अभिनेत्री सोफी टर्नर गेल्या अनेक दिवसांपासून घटस्फोटांच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. आता त्यावर सोफी टर्नरने मौन सोडत सोशल मीडियावर याबद्दल अधिकृत पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने ती जो जोनसबरोबर घटस्फोट घेत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
अभिनेत्री सोफी टर्नरने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने अधिकृत निवेदन जारी केले आहे. तिने जारी केलेले हे निवेदन जो जोनस आणि सोफी टर्नर या दोघांच्या वतीने केलेले आहे.
आणखी वाचा : “१० वर्षांपूर्वी घराची नोंदणी केली, पण…”, शशांक केतकरची मोठी फसवणूक; म्हणाला “बिल्डरला…”
“आम्हा दोघांकडून हे अधिकृत निवेदन. लग्नाच्या चार वर्षानंतर आम्ही दोघांनी परस्पर संमतीने आमचा विवाह संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे का करत आहोत याबद्दल सध्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. पण आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही प्रामाणिकपणे आशा करतो की प्रत्येकजण आमच्या इच्छेचा आणि आमच्या मुलांच्या गोपनीयतेच्या आदर करेल”, असे सोफीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान जो जोनस हा प्रियांका चोप्राचा मोठा दीर असून सोफी टर्नर ही तिची जाऊबाई आहे. सोफी टर्नर आणि जो जोनस २०१९ मध्ये विवाहबंधनात अडकले. त्या दोघांना दोन मुली आहेत.