बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा मुलगी मालती मारीबरोबर भारतात आली आहे. गुरुवारी (१४ मार्च रोजी) दुपारी तिने भारतात येत असल्याचं इन्स्टाग्राम स्टोरीवरून सांगितलं होतं. त्यानंतर ती रात्री मुंबईत पोहोचली. यावेळी तिच्याबरोबर तिची गोंडस लेक मालती मारी होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका चोप्रा तिची मैत्रीण अंजुला अचारिया व मुलगी मालती मारीसह मुंबईत आली आहे. ती ब्लॅक ट्राउजरसह मॅचिंग टॉपमध्ये छान दिसत होती. तर लहान मालतीने प्रिंटेड ड्रेस घातला होता. प्रियांकाने विमानतळावर पोहोचल्यावर पापाराझींना हसत पोज दिल्या. तर चिमुकली मालती कधी हसताना तर कधी घाबरलेली दिसली.

दरम्यान, देसी गर्ल अचानक भारतात का आली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रियांका मुंबईतील एका ब्रँडच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय. ती एका लक्झरी ज्वेलरी ब्रँडची ब्रँड ॲम्बेसेडर आहे, त्यामुळे ती मुंबईत आली अशी चर्चा आहे. मात्र, अभिनेत्रीने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.

प्रियांका चोप्राची बहीण झाली केजरीवालांची सून! मीराने ४० व्या वर्षी बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत म्हणाली…

प्रियांका चोप्राच्या दोन चुलत बहिणींची लग्नं गेल्या काही महिन्यांत झाली, पण या लग्नातही ती आली नव्हती. सप्टेंबरमध्ये परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांचं लग्न झालं, त्या लग्नाला प्रियांका येऊ शकली नव्हती. त्यानंतर आता तिची दुसरी चुलत बहीण मीरा चोप्रा हिने १२ मार्च रोजी रक्षित केजरीवालशी लग्नगाठ बांधली, पण या लग्नातही ती उपस्थित नव्हती. मीराच्या लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांनी प्रियांका चोप्रा अचानक भारतात आली आहे.

Video: मुलगा असावा तर असा! सिद्धार्थ मल्होत्राने व्हीलचेअरवर असलेल्या वडिलांची घेतली ‘अशी’ काळजी, नेटकरी म्हणाले…

प्रियांका शेवटची जिओ मामी फिल्म फेस्टिव्हलसाठी भारतात आली होती. त्यावेळी ती लेक मालती आणि पती निक जोनाससोबत आली होती, त्यानंतर निक जोनास त्याच्या कॉन्सर्टसाठी मुंबईत आला होता. त्यावेळी प्रियांका त्याच्याबरोबर आली नव्हती. दरम्यान, आता प्रियांकाने भारतात येण्याचं निमित्त काय आहे, ते लवकरच कळेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra came to mumbai with daughter malti marie video viral hrc