भारताची देसी गर्ल प्रियांका चोप्रा मागील ३ वर्षांपासून अमेरिकेमध्ये स्थायिक होती. २०१८ मध्ये तिने अभिनेता-गायक निक जोनससह विवाह केला होता. त्यानंतर ती अमेरिकेला रवाना झाली होती. पुढे करोनाचे संकट असल्यामुळे तिने भारतात येणे टाळले. याच काळात सरोगसीच्या मदतीने तिच्या मुलीचा जन्म झाला. निक आणि प्रियांका यांनी मिळून तिचे नाव मालती मेरी असे ठेवले. काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा मायदेशी परतली. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिने भारतात येण्याची माहिती चाहत्यांना दिली होती. मुंबईला आल्यानंतर ती दररोज कुठे-ना-कुठे फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती या माध्यमावर तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असते. एका प्रतिष्ठित हेअर केअर ब्रॅन्डच्या प्रमोशनल कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याचे तिला आमंत्रण मिळाले होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी तिने मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर जाणे पसंत केले. तेथे गेल्यानंतर तिने बरेचसे फोटो आणि व्हिडीओ काढले.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
marathi actress spruha joshi sister kshipra joshi baby shower ceremony photos viral
स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…

आणखी वाचा – मराठी चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवलीस का? राधिका आपटे म्हणते, “मागच्या ३ वर्षांत मला…”

मरीन ड्राईव्हवरच्या फोटो आणि व्हिडीओंना एकत्र करुन तयार केलेला व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. या व्हिडीओला प्रियांकाने ‘से ना से ना’ या गाण्याचे रिमेक्स व्हर्जन जोडले आहे. हे गाणं प्रियांका आणि अभिषेक यांच्यावर चित्रीत झालं होतं. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्लफमास्टर’ या चित्रपटामधील हे गीत आजही फार लोकप्रिय आहे. विशाल-शेखर या जोडीने या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले होते.

आणखी वाचा – अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; CM शिंदे, राज ठाकरेंच्या उपस्थित चित्रपटाची घोषणा

बॉलिवूडमध्ये पुन्हा सक्रिय होण्यासाठी प्रियांका भारतामध्ये आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती संजय लीला भन्साळी आणि विशाल भारद्वाज यांची भेट घेणार आहे. या दोन्ही दिग्गज दिग्दर्शकांसह ती आगामी चित्रपटांविषयी चर्चा करणार आहे. तिच्या ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ या निर्मिती संस्थेचे काम देखील ती पाहणार आहे.

Story img Loader