Priyanka Chopra reveals daughter Malti Marie’s face : बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे वर्षभरापूर्वी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. बाळाची गुडन्यूजनंतर सातत्याने त्यांच्या बाळाची चर्चा सुरु होती. प्रियांका चोप्रा-निक जोनसची मुलगी मालतीची एक झलक पाहण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. अशातच प्रियांकाने तिच्या लेकीचा चेहरा दिसत असलेला पहिला फोटो समोर आला आहे.
प्रियंका चोप्राने नुकतंच एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी जोनस ब्रदर्स, निक जोनस हे सर्वजण उपस्थित होते. यावेळी प्रियांका ही मालतीला हातात घेऊन पहिल्या रांगेत बसलेली पाहायला मिळाली. याचा एक व्हिडीओही प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
आणखी वाचा : लेकीला कडेवर घेत प्रियांका चोप्राने केले वाढदिवसाचे सेलिब्रेशन, फोटो व्हायरल
या व्हिडीओत निक जोनस हा मंचावर बोलत असल्याचे दिसत आहे. त्यावेळी प्रियांका ही मालतीला घेऊन बसली आहे. त्यावेळी निक हा मालतीकडे हात दाखवत असल्याचेही पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये मालतीचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे.
आणखी वाचा : Photos : देसी गर्लच्या वाढदिवसाचे रोमँटिक सेलिब्रेशन, प्रियांकाला किस करत निकने दिल्या शुभेच्छा
दरम्यान प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये जोधपुर येथे निक जोनससह लग्न केलं होतं. त्याच्या रॉयल वेडिंगची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर २०२२ मध्ये प्रियांकाने सरोगसीद्वारे मुलीला जन्म दिला.