बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असते. परदेशात राहत असूनही प्रियांका भारतीय संस्कृती अजिबात विसरलेली नाही. ती नेहमीच भारतीय परंपरेनुसार सण- उत्सव साजरे करताना दिसते. सध्या दिवाळीच्या निमित्ताने प्रियांका चोप्रा, निक जोनस आणि प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. जे पाहिल्यांनंतर नेटकरी निक जोनसच्या वागण्याचं जोरदार कौतुक करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये प्रियांकाची आई मधू चोप्रा पारंपरिक भारतीय पोशाखात दिसत आहेत. तर निक जोनस ब्लॅक आउटफिट्समध्ये खूपच हँडसम दिसत आहे. सोशल मीडियावर लोक या फोटोंचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिलं, ‘खूप सुंदर फोटो.’ दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, ‘आम्ही त्या प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो जो आपल्या सासूवर प्रेम करतो.’ आणखी एका युजरने लिहिलं, ‘जावई असा असावा.’ याशिवाय अनेक युजर्स या फोटोंवर कमेंट्स करत निक जोनसवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

आणखी वाचा- Pathaan Teaser : “उसने देश को अपना धर्म मान लिया…” शाहरुख खानच्या ‘पठाण’चा धमाकेदार टीझर पाहिलात का?

दरम्यान काही वर्षांपूर्वी दिवाळीत फटाके न फोडण्याचं आवाहन केल्याने प्रियांकाला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते ज्यात ती स्मोकिंग करताना दिसत होती. हे फोटो समोर आल्यानंतर लोकांनी प्रियांकावर दुटप्पीपणाचा आरोप केला होता.

आणखी वाचा- न्यूयॉर्कमधील सरकारी शाळांना दिवाळीची सुट्टी मिळणार असल्याचे कळताच प्रियांका चोप्राला बालपणीची आठवण; म्हणाली..

प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल बोलायचे झालं तर ती आजकाल बॉलिवूडपेक्षा हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये जास्त दिसत आहे. ती शेवटची ‘मॅट्रिक्स रिअॅक्शन’मध्ये दिसली होती. दुसरीकडे, तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra diwali celebration 2022 nick jonas take care of mother in law madhu chopra mrj