‘जी ले जरा’ या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरु आहे. चित्रपटातून अभिनेत्री कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्याची घोषणा दिग्दर्शक फरहान अख्तरने केली होती. कतरिना, आलिया आणि प्रियांकाला एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते परंतु, आता या चित्रपटासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्राची तारीख मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे ‘जी ले जरा’साठी प्रियांकाच्या ऐवजी नव्या अभिनेत्रीचा शोध घेण्यास निर्मात्यांनी सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “माझे भाऊजी” अंकुश चौधरीच्या बायकोची केदार शिंदेंसाठी खास पोस्ट; म्हणाली, “१२ वर्षांनी मी पुन्हा…”

मुव्हीफाईड बॉलीवूड यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांका चोप्राने ‘जी ले जरा’साठी नकार कळवला असून या मागील कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, सतत होणाऱ्या विलंबामुळे अभिनेत्रीने नकार दर्शवल्याचे सांगण्यात येत आहे. प्रियांका चोप्राने चित्रपटासाठी नकार कळवल्याने निर्माते नवीन नायिकेच्या शोधात आहेत. प्रियांकाच्या ऐवजी चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा किंवा कियारा अडवाणीची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर, सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी चित्रपटात दीपिका पदुकोणला घेण्याची विनंती दिग्दर्शक फरहान अख्तरकडे केली आहे.

हेही वाचा : ‘गदर २’च्या निर्मात्यांवर अमीषा पटेलचे गंभीर आरोप; म्हणाली, “ना पगार, ना गाडी, एवढ्या समस्या…”

२०२१ पासून ‘जी ले जरा’ या चित्रपटाची चर्चा सुरु होती. या चित्रपटाची कल्पना दिग्दर्शक फरहान अख्तरला प्रियांकाने सुचवली होती. आता अभिनेत्रीने स्वत:च या प्रोजेक्टमधून माघार घेतली आहे. २०२१ मध्ये घोषणा केलेल्या या चित्रपटाचे शूटिंग अद्याप सुरु झालेले नाही. तिन्ही अभिनेत्रींच्या एकत्र तारखा मिळवणे कठीण असून सध्या त्या तिघीही आपापल्या वेळापत्रकात व्यस्त आहेत. प्रियांका तिच्या पुढच्या हॉलीवूडमध्ये व्यग्र असून बॉलीवूडमध्ये कतरिना आणि आलियाचेही अनेक प्रकल्प सुरु आहेत.

हेही वाचा : “आलिया एवढं बजेट नव्हतं” रणवीर सिंहने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, “तुला पैसे…”

प्रियांकाच्या ऐवजी चित्रपटात कोणाची एन्ट्री होणार याबाबत अद्याप निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दरम्यान, आलिया भट्टचा ‘रॉकी और रानी की प्रेम’ कहानी २८ जुलैला रिलीज होणार असून, कतरिना कैफ लवकरच ‘टायगर ३’ मध्ये अभिनेता सलमान खानबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra exits farhan akhtar jee le zaraa fans propose deepika as replacements sva 00