ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून अनेक समाजिक विषयांवर भाष्य करत असते. विविध राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय घडामोडींवर ती व्यक्त होत असते. आता पुढील वर्षापासून न्यूयॉर्क शहरातील सरकारी शाळांना दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी दिली जाणार आहे, या निर्णयावर प्रियांकाने आनंद व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : उर्वशी रौतेलाने घातली ऋषभ पंतची चेन?; व्हिडीओ पाहून नेटकरी गोंधळले

सध्या प्रत्येकजण दिवाळी साजरी करण्यात मग्न आहे. या काळात लहान मुलांना उत्साहात सण साजरा करता यावा, यासाठी भारतातील शाळांना किमान दोन आठवडे सार्वजनिक सुट्टी दिली जाते. पण इतर देशात अशा सुट्ट्या दिल्या जात नाहीत. पण पुढील वर्षापासून न्यूयॉर्क शहरातील सरकारी शाळांना दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. प्रियांका चोप्राचे शालेय शिक्षण अमेरिकेतच झाले असून हा निर्णय जाहीर झाल्यावर तिला तिच्या बालपणाची आठवण झाली आहे.

प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत न्यूयॉर्क शहराच्या महापौर दिवाळीच्या निमित्ताने सरकारी शाळांना पुढील वर्षीपासून दिवाळीची सुट्टी जाहीर करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, “आज बऱ्याच वर्षांनी क्वीन्समध्ये राहणाऱ्या माझ्यातील किशोरवयीन मुलीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आहेत.”

प्रियांकाने काही वर्षे अमेरिकेत शालेय शिक्षण घेतले. तेथे काही वर्षे शिक्षण घेतल्यानंतर ती भारतात परतली आणि इथे येऊन तिने बरेलीच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवला. मनोरंजनसृष्टीत पाऊल टाकल्यावर तिला भरपूर यश मिळाले. बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर ती काही वर्षांपूर्वीपासून हॉलिवूडमध्येही काम करताना दिसते.

आणखी वाचा : नोबेल पुरस्कार विजेत्या मलालाची खिल्ली उडवणं कॉमेडियन हसन मिन्हाजला भोवलं, प्रियांका चोप्राने घडवली अद्दल

प्रियांका सध्या पॅट्रिक मॉर्गन दिग्दर्शित साय-फाय ड्रामावर काम करत आहे. त्यासोबतच पुढील वर्षी ती आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याबरोबर फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.