बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस नेहमीच लेक मालती मेरीबरोबर क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतात. प्रियांका चोप्राने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्याबरोबर मुलगी मालती आणि पती निक जोनस दिसत आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा तिच्या कुटुंबाबरोबर समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसत आहे. पण या फोटोंमुळे प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी प्रियांकाच्या या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे.
प्रियांकाची मुलगी मालती मेरी एक वर्षाची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘वोग’ मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांकाने सोरोगोसीबद्दल सांगितले होतं. प्रियांका म्हणाली होती की, “आरोग्याच्या समस्येमुळे मी सरोगसीची मदत घेतली होती. मालतीचा जन्म झाला तेव्हा ती ऑपरेशन थिएटरमध्ये होती. मालतीला बराच वेळ आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. हे सर्व पाहणे माझ्यासाठी सोपे नव्हते. मुलीचा जीव वाचेल की नाही, अशी भीती आम्हाला वाटत होती.”
आणखी वाचा- “तो माझ्याशी लग्न करेल असं वाटलेलं पण…” निक जोनसच्या एक्स गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा
आता प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये निक, प्रियांका आणि मालती एकत्र दिसत आहेत. यातील एका फोटोमध्ये तिघंही समुद्र किनाऱ्यावर उभे असलेले दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये प्रियांका आणि मालती बाल्कनीत उभे असलेले दिसत आहेत. प्रियांकाने या फोटोंमध्ये मालतीच्या चेहऱ्यावर हार्ट इमोजी लावले आहेत. युजर्सना ही गोष्ट आवडलेली नाही. या फोटोंवर एका यूजरने कमेंट करताना लिहिलं, ‘तुम्ही तिचा चेहरा का लपवत आहात, जोपर्यंत तुम्हाला तिचा चेहरा दाखवायचा नाही तोपर्यंत फोटो शेअर करू नका.’ दुसऱ्या यूजरनं म्हटलंय, ‘मुलांचे फोटो लपवण्याचा ट्रेंड थांबवा.’
दरम्यान प्रियांका चोप्राने २०१८ मध्ये जोधपुर येथे निक जोनससह लग्न केलं होतं. त्याच्या रॉयल वेडिंगची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर २०२२ मध्ये प्रियांकाने सरोगसीद्वारे मुलीला जन्म दिला.