करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूड सोडून गायनाला सुरुवात का केली आणि अमेरिकेत का काम शोधू लागली, याचा खुलासा प्रियांकाने नुकताच एका मुलाखतीत केला आहे. बॉलिवूड सोडून जावं लागलं असल्याचा खुलासा तिने केला. या खुलासानंतर बॉलिवूडमधून अनेक कलाकरांच्या प्रतिक्रिया येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने चित्रपट अभिनेता करण जोहरमुळेच प्रियांकाला बॉलिवूड सोडून जाव असल्याचा आरोप केला आहे. शाहरुख खान बरोबरची प्रियांकाची मैत्री करणला आवडली नसल्यामुळेच त्याने प्रियांकावर बंदी घातली असल्याचा आरोप कंगनाने केला आहे.
प्रियांका चोप्राच्या बॉलिवूडमधून बाहेर पडल्याचा खुलासा केल्यानंतर कंगना रणौतनेही प्रियांकाची बाजू घेत पुन्हा एकदा आपला बॉलिवूड माफियांवर निशाणा साधला होता. कंगनाने लिहिले की बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्राविरोधात ग्रुप बनवला होता. तिला धमक्या दिल्या आणि तिला फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर काढले. एका सेल्फ मेड महिलेला भारत सोडण्यास भाग पाडले गेले. करण जोहरने तिच्यावर बंदी घातली हे सर्वांना माहीत आहे.” असा गंभीर आरोप कंगनाने केला होता.
कंगनाने ट्वीट करत शाहरुख आणि प्रियांकाच्या मैत्रीवर भाष्य केले आहे. कंगनाने ट्वीटमध्ये लिहले आहे. मीडियाने करणसोबत मिळून प्रियांकाबद्दल मनात येईल ते काहीही लिहिले कारण तिची शाहरुख खानसोबत चांगली मैत्री होती. नेहमीच अशा आउटसाइडर्सच्या शोधात असणाऱ्यांना प्रियांकाच्या रुपात पंचिंग बॅग मिळाली. या लोकांनी प्रियांकाला इतका त्रास दिला की शेवटी तिला भारत सोडावा लागला.’
हेही वाचा- Video : राखी सावंतने उडवली मलायका अरोराच्या चालण्याची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
कंगनाच्या या ट्विटनंतर शाहरुख खानसोबतच्या मैत्रीमुळेच प्रियांकाला देश सोडावा लागला का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एकेकाळी शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेअरच्या चर्चाही खूप रंगल्या होत्या. प्रियांका आणि शाहरुखने ‘डॉन’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यावेळी दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. शाहरुखने प्रियांकाला नेहमीच चांगली मैत्रीण मानले आणि डेटिंगच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. मात्र, त्यांच्या परंतु त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरुच होत्या.
शाहरुखच्या मैत्रीचा प्रियांकाच्या करिअरवर परिणाम?
एकदा एका पार्टीत शाहरुख खानने प्रियांका चोप्राला किस केले होते. एसआरकेची पत्नी गौरी खान या गोष्टीमुळे इतकी नाराज झाली होती की त्याचा परिणाम प्रियांकाच्या करिअरवर होऊ लागला. करण जोहरलाही शाहरुख आणि प्रियांकाची जवळीक आवडली नाही, त्यामुळे त्यानेही प्रियांकावर बहिष्कार टाकला. असं म्हणतात गौरीने शाहरुखला प्रियांकाबरोबर पुन्हा काम न करण्याची तंबी दिली होती.