बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या सिटाडेलच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारणारी प्रियांका तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. तिने आतापर्यंत एकापेक्षा एक भूमिका वठवल्या आहेत. पण एकेकाळी ती तिच्या भूमिकेत इतकी शिरली होती की घरातही तशीच वागायची, तिची वर्तणूक पाहून तिला आईने फटकारलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आर्यन खानने निसाला पळवून नेल्यावर काय करशील? काजोलच्या उत्तराने शाहरुख खान झालेला नि:शब्द

२००४ मध्ये प्रियांकाचा ‘ऐतराज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यात तिने सोनिया कपूर नावाची भूमिका केली होती. हे एक नकारात्मक पात्र होते, ज्यामध्ये तिने करीना कपूर आणि अक्षय कुमारबरोबर काम केले होते. प्रियंका चोप्राने सांगितलं होतं की, ती तिच्या घरातही सोनिया कपूरसारखी वागू लागली होती, ज्यामुळे तिला आई रागावली होती.

प्रियांका चोप्राने ३०व्या वर्षी केलेले Eggs Freeze; आता खुलासा करत म्हणाली, “माझ्या आईने…”

‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रियांका चोप्राला विचारण्यात आलं होतं की, पात्रात किंवा भूमिकेत शिरणे कठीण आहे की त्यातून बाहेर पडणे? यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणालेली, “पात्रात उतरणे कठीण आहे. मी कोणतीही पद्धत ठरवून अभिनय करत नाही. एकदा माझ्याबरोबर असं घडलं होतं आणि त्यावेळी आई म्हणालेली की तू माझ्या घरी येत असशील तर या पात्रातून बाहेर ये”.

प्रियांका पुढे म्हणाली, “मी सोनियाच्या पात्रासारखी हळू चालत असे. मी हळूच बोलायचे. मी स्टाइलने कॉफी उचलायचे आणि हळूच वर बघायचे. माझ्या आईने माझा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, जेणेकरून मी घरी कशी वागते हे ती मला सांगता येईल. एकदा आई म्हणाली, ‘हॅलो इथे (घरात) कॅमेरा नाही. त्यामुळे घरात असल्यासारखं वाग.’ त्यावेळी माझ्याबरोबर जे घडलं ते खूप मजेदार होतं. मला वाटलं मी काय करतेय? पण मी खूप लहान होते आणि माझ्या पात्राबद्दल खूप घाबरले होते. त्यामुळे मी त्या कॅरेक्टरमध्येच घरी यायचे.”