प्रियांका चोप्रा ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस आहे. हिंदी सिनेसृष्टीत काम करण्याबरोबरच तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज ती हॉलीवूड चित्रपटांमध्ये हे महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते.

प्रियांकाचा हा प्रवास सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीला तिला अनेक कटू प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. तिने मिस वर्ल्डचा किताब जरी जिंकला असला तरीही बॉलीवूडमध्ये काम करत असताना सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला तिच्या रंगावरून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. परंतु त्या सर्वावर मात करून स्वतःच्या जिद्दीने तिने यश संपादन केलं. तिच्या नावाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठीही विचार करण्यात आला होता. त्यामागे एक खास कारण आहे.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Singh : केंब्रिजमध्ये शिक्षण, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते देशाचे पंतप्रधान! अशी होती मनमोहन सिंग यांची कारकीर्द
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग

आणखी वाचा : Video: “भारतीय चित्रपटांत फक्त हिप्स आणि बुब्स…”, प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे नेटकऱ्यांचा संताप

२००९ साली आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘व्हॉट्स युवर राशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासाठी प्रियांकाच्या नावाचा गिनीज रेकॉर्डसाठी विचार करण्यात आला होता. याचं कारण म्हणजे या चित्रपटामध्ये १२ वेगवेगळ्या राशी असलेल्या १२ वेगवेगळ्या मुलींची भूमिका प्रियांकाने साकारली होती. त्यावेळी प्रियांका अशी एकमेव अभिनेत्री ठरली जिने एकाच चित्रपटात १२ भूमिका साकारल्या.

हेही वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

दरम्यान, प्रियांकाचं नाव जगभरातील टॉप १०० कर्तबगार महिलांच्या यादीत सामील आहे. याचबरोबर तिच्याकडे २ राष्ट्रीय पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार आहेत. याचबरोबर भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्काराने ही गौरवलं आहे.

Story img Loader