प्रियांका चोप्रा ही बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस आहे. हिंदी सिनेसृष्टीत काम करण्याबरोबरच तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज ती हॉलीवूड चित्रपटांमध्ये हे महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसते.
प्रियांकाचा हा प्रवास सोपा नव्हता. करिअरच्या सुरुवातीला तिला अनेक कटू प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. तिने मिस वर्ल्डचा किताब जरी जिंकला असला तरीही बॉलीवूडमध्ये काम करत असताना सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला तिच्या रंगावरून नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. परंतु त्या सर्वावर मात करून स्वतःच्या जिद्दीने तिने यश संपादन केलं. तिच्या नावाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठीही विचार करण्यात आला होता. त्यामागे एक खास कारण आहे.
२००९ साली आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘व्हॉट्स युवर राशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासाठी प्रियांकाच्या नावाचा गिनीज रेकॉर्डसाठी विचार करण्यात आला होता. याचं कारण म्हणजे या चित्रपटामध्ये १२ वेगवेगळ्या राशी असलेल्या १२ वेगवेगळ्या मुलींची भूमिका प्रियांकाने साकारली होती. त्यावेळी प्रियांका अशी एकमेव अभिनेत्री ठरली जिने एकाच चित्रपटात १२ भूमिका साकारल्या.
दरम्यान, प्रियांकाचं नाव जगभरातील टॉप १०० कर्तबगार महिलांच्या यादीत सामील आहे. याचबरोबर तिच्याकडे २ राष्ट्रीय पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार आहेत. याचबरोबर भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्काराने ही गौरवलं आहे.