अभिनेत्री व ‘बिग बॉस १७’ ची फायनलिस्ट मनारा चोप्राचा शुक्रवारी (२९ मार्च रोजी) वाढदिवस होता. मनाराच्या ३३ व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला तिची बहीण प्रियांका चोप्रा व तिचा पती निक जोनस उपस्थित होते. प्रियांका ही मनाराची मामेबहीण आहे. मनाराच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं.
लाल रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये मनारा खूप सुंदर दिसत होती. तर बहिणीच्या वाढदिवसासाठी प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस निवडला होता. निक जोनस ट्रान्सपरंट शर्ट व कॅज्युअल पँटमध्ये या सेलिब्रेशनसाठी पोहोचला. या तिघांनी एकत्र पोज दिल्या. यावेळी प्रियांका मस्ती करताना दिसली.
Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर मनारा, प्रियांका व निक यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तिघांबरोबर चोप्रा कुटुंबियांनी देखील या पार्टीला हजेरी लावली. सर्वांनी मनाराचा वाढदिवस दणक्यात साजरा केला. मनाराची बहीण मितालीदेखील याठिकाणी उपस्थित होती. वरिंदर चावला, विरल भयानी या पापाराझी अकाउंट्सवरून व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.
निक व प्रियांका वेळ काढून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी आले, त्याबद्दल मनाराने त्यांचे आभार मानले. “प्रियांका दिदी आणि निक जीजू दोघेही आलेत. घरातील सदस्य आले की वाढदिवस अजून खास होतो. त्यांनी त्यांच्या व्यग्र शेड्यूलमधून माझ्यासाठी वेळ काढला, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे, सर्वांचे खूप खूप आभार,” असं मनारा म्हणाली.
प्रियांका व निक दोघेही दोन आठवड्यांपासून भारतात आहेत. आधी प्रियांका लेक मालतीला घेऊन भारतात आली, त्यानंतर दोन दिवसांनी निक भारतात आला. दोघांनी नोएडामध्ये कुटुंबाबरोबर होळी सेलिब्रेशन केलं. त्यानंतर आता ते मनाराच्या वाढदिवसासाठी मुंबईला आले.