अभिनेत्री प्रियांका चोप्रा काही ना काही कारणाने नेहमी चर्चेत असते. सध्या प्रियांका तिचा पती निक जोनास आणि मुलगी मालतीबरोबर अमेरिकेत आहे. मात्र, लग्नाअगोदर प्रियांकाचे बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांसोबत नाव जोडले गेले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत प्रियांका आपल्या बॉलीवूडमधील एक्स नात्याबद्दल मनमोकळेपणे बोलली. ‘कॉल हर डॅडी’ पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये प्रियांकाने तिच्या बॉलीवूडमधील प्रेमप्रकरणावर भाष्य केले आहे.

हेही वाचा- परिणीती-राघव आपल्या साखपुड्यात ‘या’ फेमस डिझायनरचे घालणार कपडे; असा असेल दोघांचा लूक

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…

मुलाखतीत प्रियांकाला विचारण्यात आले होते की, ती तिचा रोमँटिक जोडीदार निवडताना काही विशिष्ट पॅटर्न फॉलो करते का? याला उत्तर देताना प्रियांकाने सांगितले की, असा कोणताही पॅटर्न नाही. स्वतःला एक ‘मोनोगॅमिस्ट’ म्हणत प्रियंका म्हणाली, ‘मी एकामागून एक नात्यात जात राहिले. मी स्वतःला वेळ देणे बंद केले होते. मी ज्या कलाकारांसोबत काम केले किंवा सेटवर भेटले, त्यांना डेट केले. नाते कसे असावे हे मला माहीत होते आणि याच प्रयत्नात माझ्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीला मी त्या साच्यात बसवत गेले.

प्रियांका पुढे म्हणाली की, प्रत्येक वेळी रिलेशनशिपमध्ये ती एकच चूक करत होते की, ती स्वत:ला केअर टेकरप्रमाणे वागवत होती. प्रियांका म्हणाली की, मी माझी नोकरी, माझी आवड आणि स्वतःला कधीच महत्त्व दिले नाही. मला खरेच वाटू लागले की, मी एक पायपुसणे आहे आणि हे सामान्य आहे. कारण मी ज्या पार्श्वभूमीतून आले आहे, तिथे स्त्रियांना हेच शिकवले जाते. कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी, पुरुषाला आनंदी ठेवण्यासाठी, कामावरून घरी आल्यावर त्याला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला हे सगळे करावे लागते.

हेही वाचा- “द केरला स्टोरी’ला विरोध करणारे राजकीय पक्ष हे…”; चित्रपटाबाबत स्मृती इराणी यांची प्रतिक्रिया

प्रियांकाने सांगितले की, निक तिच्या आयुष्यात येण्याआधी ती ज्या रिलेशनशिपमध्ये होती त्यामध्ये तिला हरवल्यासारखे वाटले. निक जोनाससोबत लग्न करण्यापूर्वी प्रियांकाने दोन वर्षांचा ब्रेक घेतला आणि आपण प्रत्येक वेळी रिलेशनशिपमध्ये कोणती चूक केली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही समजून घेणार नाही, असे प्रियांका म्हणाली.

प्रियांका म्हणाली की, मी ज्या लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते ते सगळे चांगले लोक होते. प्रियांका चोप्राचे नाव बॉलीवूडमधील अक्षय कुमार, शाहरुख खान, हरमन बावेजा आणि शाहिद कपूरसोबत जोडले गेले आहे.

Story img Loader